सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे. नातेवाईक एकमेकांच्या घरी भेटीगाठीसाठी जातं आहे. दिवाळी म्हणजे, दिव्यांचा सण..! मात्र असं असलं तरी देखील याच काळात काही कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला असल्याने हळहळ व्यक्त केली जातं आहे. नुकतच हाती एक खळबळजनक वक्तव्य येत आहे.
अपघातात एका दुचाकीवर जाणाऱ्या तरुणांचा अपघात झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातं आहे. मुलाच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
वाचा नेमकं घडलं काय?
चाकण येथून परभणीकडे दिवाळीनिमित्त दुचाकीवर जाणाऱ्या तरुणांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. मिळालेल्या महितीनुसार, रविवारी पहाटे ४ वाजता बाळेवाडी फाटा येथे हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे.
याबाबत मिळालेल्या महितीनुसार, मृत तरुणाचे मोहन पाडुरंग बर्वे ( रा. वरवंटी, गंगाखेड) असे नाव आहे. दिवाळी सणासाठी मोहन पाडुरंग बर्वे आणि पालमचा सिध्देश्वर दिंगाबर धुळगुडे हे दोघे मित्र गावी निघाले होते. मात्र मधीच त्यांचा अपघात झाल्याने होत्याच नव्हतं झालं.
मिळालेल्या महितीनुसार, बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाटा येथे पहाटे चार वाजता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात सिद्धेश्वर गंभीर जखमी झाला. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल