लग्न म्हटलं की नाचगाणी, डीजे या गोष्टी येतातच. लग्नात डीजे नसेल तर लग्न हे लग्न वाटत नाही असे म्हणतात. या डीजेच्या गाण्यावर नाचून मित्र, मैत्रिणी, इतर सदस्य लग्नाची मजा घेत असतात. अशाच एका लग्नातील डीजेच्या ‘नाच रे मोरा’ या गाण्यावरचा व्हिडीओ गेल्या वर्षी प्रचंड व्हायरल झाला होता.
तुम्हाला तो व्हिडीओ नक्कीच आठवला असेल. सोशल मीडियावर त्या व्हिडीओला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. अनेक लाईक्स त्या व्हिडीओला मिळाले होते. ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर थिरकणाऱ्या त्या मुलाचा आणखी एक व्हिडिओ आता आला आहे.
मात्र, यावेळी हा मुलगा कोणाच्या लग्नात नाचत नसून, स्वतः च्याच लग्नात नाचत आहे. अर्थातच या पुण्यातील तरुणाचं आता लग्न झालं. स्वतःच्या लग्नात देखील या तरूणाला मोराचा डान्स करण्याचा मोह आवरलेला नाही. स्वतःच्याच लग्नात त्याने ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर डान्स केला आहे.
त्याचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओला भरपूर लाईक्स मिळाल्या आहेत. या तरूणाचा पहिला व्हिडीओ साधारण एक वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा होता. अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या व्हॉट्स अपच्या स्टेटसला ठेवलेला.
https://www.facebook.com/BeingMarathi.in/videos/1690883114611133/
आता या तरूणाचं लग्न झालं. यातंही त्याने केलेला डान्स तुफान व्हायरल झालाय. अनेकांनी या तरूणाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. संबंधित तरुण हा पुण्यातील आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होत आहे.
सोशल मीडिया असे माध्यम बनले आहे, ज्यामुळे लोक आपल्या कला लोकांपुढे मांडू शकतात. सध्या सोशल मीडियावर अनेकजण आपले व्हिडीओ पोस्ट करत असतात. यामध्ये कॉमेडी, जोक, कविता, गाणी, नाच यासारख्या अनेक कला लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण दाखवत असतात.