Share

अबब! विसावलेल्या कोब्र्याला तरुणाने घातली अंघोळ, फिरवला डोक्यावरून हात; थरारक व्हिडिओ व्हायरल

सोशल मिडीयावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ जुने असले तरी त्यांना तितकाच प्रतिसाद मिळत असतो. आता देखील असाच एक दोन वर्षापूर्वीचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका तरुणाने चक्क किंग कोब्रालाच बादलीने अंघोळ घातली आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, उन्हाने तापलेला कोब्रा विसाव्यासाठी एका झाडाच्या मागे फणा काढून थांबला आहे. तितक्यात त्या ठिकाणी एक तरुण येतो. हा तरुण कसलाही विचार न करता कोब्राच्या अंगावर पाणी टाकतो. तसेच कोब्राच्या डोक्यावरुन हात फिरवतो.

https://twitter.com/susantananda3/status/1264562592833507328?s=20&t=KNVVmNuA9ocppF96La_l5Q

सांगण्यात येत आहे की, हा कोब्रा एक जंगली कोब्रा आहे. तो विसाव्यासाठी झाडाखाली थांबला होता. तेवढ्यात या तरुणाने त्यावर पाणी टाकण्याचे काम केले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी असे धाडस न करण्याचे आवाहन केले आहे.

असे धाडक व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. हा व्हिडीओ मोजून 31 सेकंदाचा आहे. परंतु तरी देखील या व्हिडीओला अनेकांनी शेअर केले आहे. या व्हिडीओला व्ह्यूजही लाखोंच्या संख्येत मिळाले आहेत. यापूर्वीही प्राण्यासोबत वेगवेगळे धाडक केल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत.

परंतु प्रत्येकच वेळा असे प्रकार यशस्वी होत नाही. मध्यंतरी असाच एक कोब्रासोबत मस्करी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कोब्राने त्या माणसाला श्रणाचा विलंब न करता गिळून टाकले होते. मुख्य म्हणजे हा व्हिडीओ फेक नसून सत्य होता.

त्यामुळे असे प्रयोग इतरांनी न करण्याचे आवाहन सोशल मिडीयावर सर्प मित्र करताना दिसत होते. सापांना वाचविण्यासाठी त्यांना पुन्हा त्यांच्या ठिकाणी सोडवण्यासाठी सर्प मित्र काम करत असतात. आपल्या कामाची माहिती ते अनेकवेळा वेगवेगळ्या व्हिडिओमधून देताना दिसतात.

महत्वाच्या बातम्या
करोडो घेऊन ‘या’ 8 खेळाडूंना भोपळाही फोडता नाही आला; यामध्ये 17 कोटी घेणाऱ्या प्लेअरचाही समावेश
एसटी कर्मचाऱ्यांचा ३१ मार्चचा अल्टिमेटम संपला, संपकऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले…
महागाईच्या प्रश्नावर भडकले बाबा रामदेव; म्हणाले, काय करायचंय ते करून घे, शांत राहा, नाहीतर..
RRR खतरनाक! बॉक्स ऑफिसवर RRR ने घातला धुमाकूळ, ६ दिवसात पाडला ‘एवढ्या’ पैशांचा पाऊस

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now