Share

साप चावला म्हणून रागाच्या भरात तरूणाने सापालाच खाल्ले, पुढं घडलं असं काही.., वाचून अवाक व्हाल

एका तरुणाला साप चावला आणि त्या रागात त्याने त्या सापालाच खाऊन टाकले, अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेश मधील बांदा येथे घडली आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

हे प्रकरण कामसीन पोलीस ठाण्याच्या सोहट गावातील आहे. येथे राहणारे माताबल सिंग हे शेतातून घरी परतत होते. यादरम्यान त्यांना वाटेत साप चावला. यानंतर माताबल यांना राग आला आणि त्यांनी त्या सापाला स्वतः चे जेवण बनवले. यानंतर ते घरी परतले.

त्याच्या हातावर रक्त पाहून कुटुंबीयांनी चौकशी केली असता त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. तरुणाने साप खाल्ला हे कुटूंबीयांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ तरुणाला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण जो साप चावला तोच खाल्ला यामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

तरुणाला साप चावला आणि त्यानंतर त्याने साप खाल्ला तरीही तो जिवंत कसा याबद्दल पोलिसांना देखील आश्चर्य वाटले. मात्र, अशा तरुणासोबत जे घडलं ते अपवाद आहे, कोणीही अशाप्रकारे पाऊल उचलू नाही असे पोलिसांकडून तसेच डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

संबंधित तरुण साप चावून देखील जिवंत कसा याबद्दल डॉक्टर तपास करत आहेत. साप पाहायला तरी तोंडचे पाणी पळून जाते, लोकांना पळता भुई थोडी होते. त्यामुळे साप चावला म्हणून रागात सापलाच खाल्ला ही बातमी ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सगळ्यात विषारी सापाबद्दल  बोलायचे झाल्यास, या जगात सापाच्या अशा अनेक प्रजाती आहेत, ज्याच्या दंशामुळे काही मिनिटांत प्राण जातात. यामध्ये सर्वांत विषारी सापांमध्ये कोब्रानंतर नाव घेतले जाते ते ब्लॅक मांबा या सापाचे. या सापाला साक्षात यम म्हटले जाते.

इतर

Join WhatsApp

Join Now