Share

योगींच्या आई आजही शेतात राबतात; डबडबलेल्या डोळ्यांनी स्वत:च्या संन्यासी मुलाला भिक्षा वाढली होती

योगी आदित्यनाथ यांचे स्वप्न राष्ट्र उभारणीचे आणि हिंदू धर्माच्या बळकटीकरणाचे होते. मुलाने सरकारी नोकरी करावी असे स्वप्न त्यांच्या आईने पाहिले होते. पण योगी आदित्यनाथ यांचे स्वप्न देशसेवा करायचे होते. त्यामुळे या मातेने त्यांना देशसेवा करण्यासाठी परवानगी दिली.

योगी आदित्यनाथ यांनी लहानपणी गोरखपुरला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या आईला वाटले की त्यांनी एखाद्या सरकारी कार्यालयात नोकरी केली आहे. पण जेव्हा त्यांची संन्यासी होण्याची बातमी आली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रु अनावर झाले.

पोटचा मुलगा आईपासून दूर जातो हे योगी आदित्यनाथ यांच्या आईसाठी अकल्पनियच होते. योगी आदित्यनाथ यांच्या माता सावित्रीदेवी या उत्तराखंडच्या पौर गाढवलमाधील पंचूर या गावात राहतात.

त्या 85 वर्षाच्या आहेत. तरीही अजून त्या स्वत:ची कामे स्वत:च करतात. त्या त्यांची दिवसभराची कामे पूर्ण करण्यासाठी पहाटे 4 वाजताच उठतात. त्यांची कामे झाल्यानंतर त्या त्यांच्या शेतात काम पाहणीसाठी जातात.

सावित्रीदेविंना 4 मुली आणि 3 मुले आहेत. सावित्रीदेवी 7 मुलांच्या आई आहेत. 2021 मध्ये सावित्रीदेवींचे पती आनंदसिंग बिश्त यांचे निधन झाले. महंत अवैद्यनाथ यांना उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर महंत अवैद्यनाथ यांनीच योगी आदित्यनाथ यांच्या पालकांना त्यांच्या मुलाच्या सेवेची संकल्पना पटवून दिली.

महंत अवैद्यनाथ म्हणाले, की तुमच्या 3 मुलांपैकी एका मुलाने माझ्यासोबत राष्ट्र उभारणीसाठी आणि हिंदू धर्माच्या बळकटीकरणासाठी येण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया तुम्ही त्याला परवानगी द्यावी.

सावित्रीदेवींसाठी हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता. कारण दोन महिन्यांनंतर योगी आदित्यनाथ त्यांच्या आईकडे भिक्षा मागण्यासाठी जाणार होते. जेव्हा योगी आदित्यनाथ त्यांच्या आईकडे एक संन्यासी म्हणून भिक्षा मागायला गेले.

तेव्हा त्यांच्या आईनेसुद्धा त्यांच्या भुमिकेचा आदर करत त्यांना भिक्षा देऊन त्यांना महाराज म्हणायला सुरवात केली. सावित्री देवी आणि आनंदसिंग बिश्त यांनी योगी आदित्यनाथ यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मठाला दोन वेळा भेट दिली.

आज सावित्री देवी आपल्या मुलाच्या यशाचा आनंद साजरा करतात. ज्याने योगी म्हणून प्रवास केला, महंत म्हणून काम केले आणि आता तेच भारतातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now