श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. या सिरीजमधील दुसरा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला आहे. हा विजय काही खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे जिंकता आला. रोहित शर्मा ने सामना झाल्यानंतर उत्तर कामगिरी करत विजय मिळवून देणाऱ्या ‘या’ खेळाडूंचे कौतूक केले आहे.
रोहित शर्माने कर्णधार पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर टीम इंडिया चांगला खेळ करताना दिसत आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंकेला देखील मात दिली आहे. श्रीलंकेविरूद्धची टी-20 सिरीज देखील टीम इंडियाने आपल्या नावे केली आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांनी शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
धर्मशाळा येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० मध्ये श्रेयसने नाबाद 74, जडेजाने नाबाद 45 आणि संजू सॅमसनने 39 धावा केल्या. यात आपल्या उत्तम खेळीमुळे संजूही कर्णधार रोहित शर्माच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. यामुळे टीममध्ये बऱ्याच काळानंतर कमबॅक केलेल्या संजू सॅमसनचे रोहित शर्माने भरभरून कौतुक केलं आहे.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, संजू सॅमसनने दाखवून दिलंय की, तो किती चांगली खेळी खेळू शकतो. खेळाडूंना फक्त त्यांना व्यक्त करण्याची संधी हवीये. आम्ही संजूला संधी देत राहू. त्याचा अधिक फायदा घेण्याची संधी त्याने सोडू नये. असे रोहित शर्मा म्हणाला.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसनलाही संधी मिळाली होती, पण त्याच्या फलंदाजीला यश आले नाही. या दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली, ज्याचे त्याने शानदारपणे खेळ केले. संजूने 25 चेंडूत 156 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.
सामन्यानंतर रोहित बोलला की, आम्हाला त्या खेळाडूंवर लक्ष द्यायचं आहे जे टीममध्ये आहेत आणि उत्तम खेळ करण्याच्या जवळपास आहेत. त्यासोबत यावेळी श्रेयस अय्यरने आणि रवींद्र जडेजा यांनी देखील मोठी खेळी खेळली, असे म्हणत त्यांचे देखील कौतुक केले.