‘या’ अभिनेत्रीने सुशांतवर लावले होते लैंगिक छळाचे आरोप, पण नंतर वेगळेच सत्य आले होते समोर

सुशांत सिंग राजपूत आता आपल्यात नाही. त्याच्या दुःखद निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजही त्याच्या आयुष्याशी निगडित गोष्टी त्याच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि चाहत्यांना वेळोवेळी आठवत राहतात, त्याबद्दल ते जाहीरपणे बोलत असतात. सुशांतने त्याच्या छोट्या बॉलीवूड कारकिर्दीत मोठे चढउतार पाहिले. त्याच्या मृत्यूच्या सुमारे दोन वर्षांपूर्वी एक वाईट टप्पा आला, जेव्हा चित्रपट उद्योगात #MeToo मोहिमेची ठिणगी पडली होती आणि लैंगिक छळाची प्रकरणे समोर येत होती. (The ‘Yaa’ actress had accused Sushant of sexual harassment)

ही गोष्ट ऑक्टोबर 2018ची आहे. ‘दिल बेचारा’ सिनेमामध्ये सुशांत सिंग राजपूतची नायिका असलेल्या संजना संघीने त्याच्यावर चित्रपटाच्या सेटवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्याची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुशांतविरोधात नकारात्मक बातम्या येऊ लागल्या. वेब मीडिया आणि प्रिंट मीडियानेही त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे सुशांतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला.

पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेचा दिग्दर्शक कुशल झवेरी याने सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास दोन महिन्यांनी सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते. कुशल झवेरीने एका पोस्टमध्ये लिहिले की, “जुलै 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत मी सुशांतसोबत होतो. मी त्याला सर्वात कमकुवत ऑक्टोबर 2018 मध्ये #Metoo मोहिमेदरम्यान पाहिले होते. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याला टार्गेट करत होते. आम्ही संजनाला संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला. ती USA मध्ये असल्याने तेव्हा ती या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यायला उपस्थित नव्हती. हा विचित्र योगायोग आहे.

कुशलने पुढे लिहिले, सुशांतला माहित होते की, त्याला कोण टार्गेट करत आहे. पण त्याला समोर आणण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पुरावे नव्हते. मला आठवते की, ४ दिवस सुशांत रात्री झोपू शकला नाही. त्याने वाट पाहिली. तो संजनाला आरोपांचे स्पष्टीकरण देण्यास सांगत होता. अखेर पाचव्या दिवशी जेव्हा संजनाने स्पष्टीकरण दिले तेव्हा कठीण लढाई जिंकल्यासारखे वाटले.

संजनाने 23 ऑक्टोबर 2018 रोजी अमेरिकेतून परतल्यानंतर सोशल मीडियावर स्पष्टीकरण देताना लिहिले की, “काल मी अमेरिकेच्या दीर्घ दौऱ्यावरून परतल्यावर माझ्या ‘किझी अँड मॅनी’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या गैरवर्तन आणि गैरवर्तणुकीबाबत अनेक निराधार कथा वाचल्या. माझ्यासोबत अशी कोणतीही घटना घडली नाही हे स्पष्ट करू इच्छिते. या चर्चेला पूर्णविराम देऊया.”

रिया चक्रवर्ती, जी त्याची गर्लफ्रेंड होती, तिने सुशांतवरील आरोपांचे स्पष्टीकरण देण्यास उशीर केल्याबद्दल संजना संघीला फटकारले होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “संजना सांघी आणि रोहिणी अय्यर यांनी त्याला (सुशांत) त्रास दिला. संजना संघीने आरोप केला होता की, सुशांतने तिचा छळ केला आणि #MeToo आरोपांनी तिला त्रास दिला. स्पष्टीकरण दिले नाही.

महत्वाच्या बातम्या-
..अन् सासूचे निधन झाले तरी मी १५ मिनीटं हसत होते, अर्चना पूरण सिंगच्या वक्तव्याने सगळेच झाले हैराण
‘या’ IPS ने संजय दत्तला सगळ्यांसमोर चोपला होता; वाचा त्यांनी स्वत:च सांगीतलेला थरारक किस्सा
सापासारखे सरपटणारे एलियन्स पृथ्वीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात; वैज्ञानिकांनी दिला ‘हा’ इशारा