Share

‘या’ भारतीय क्रिकेटपटूने संघ सहकाऱ्याच्या पाठीत खंजीर खूपसत त्याच्या बायकोशी संबंध ठेवले होते

या लेखाच्या माध्यमातून आम्ही अशाच ५ खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, ज्यांनी मैत्रीला लाजवताना मित्राच्या पत्नीशी किंवा आईशी संबंध ठेवले. या यादीत क्रिकेटपटूंच्या नावांचाही समावेश आहे, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्याचबरोबर इतर खेळांच्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.

क्रीडा जगताचे अनेक चाहते आकर्षित होतात. ग्लॅमरने सजलेल्या या दुनियेमागे काही काळी सत्ये आहेत जी फार कमी लोकांना माहीत आहेत. क्रिकेट असो की इतर खेळ, जेव्हा खेळाडू एकत्र खेळतात तेव्हा त्यांच्यात मैत्री होणे साहजिक असते, पण ही मैत्री त्यांच्यासाठी कधी जीवघेणी ठरते हे त्यांनाही कळत नाही. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी मैत्रीला लाजवेल.

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि मुरली विजय एकेकाळी चांगले मित्र होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी जाणे होते, यादरम्यान दिनेश कार्तिकची पत्नी निकिता बंजाराही मुरली विजयची मैत्रीण झाली. लवकरच मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्या पत्नीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दिनेश कार्तिकला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने निकिता बंजारासोबत घटस्फोट घेतला.

श्रीलंकेचा माजी फलंदाज उपुल थरंगाने त्याचा मित्र तिलकरत्ने दिलशानची पत्नी निलंका विथांगेसोबत लग्न केले आहे. तिलकरत्ने दिलशान आणि निलंका विठंगे यांनाही एक मुलगा आहे. जेव्हा दिलशानला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने निलंकाला घटस्फोट दिला, तर उपुल थरंगाने नंतर निलंकाशी लग्न केले. मात्र, या घटनेनंतरही दोन्ही खेळाडूंनी श्रीलंकेच्या संघाकडून खेळणे सुरूच ठेवले.

प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आणि एनबीए स्टार डेलोंटे वेस्टने त्याचा सर्वात चांगला मित्र जेम्स लेब्रॉनच्या आईशी नातेसंबंध तयार केले. २०१०ध्ये, जेम्स लेब्रॉनचा जवळचा मित्र डेलोंटे वेस्ट आणि त्याची आई ग्लोरिया यांचे अफेअर असल्याची बातमी आली होती. त्यावेळी जेम्स लेब्रॉनने ही बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले होते परंतु, २०१४मध्ये डेलोंटे आणि ग्लोरिया यांनी स्वतःच त्यांच्या शारीरिक संबंधांची पुष्टी केली होती.

बास्केटबॉलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करणारा टोनी पार्कर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. टोनी पार्करचे त्याच्या मित्र ब्रेंट बॅरीच्या पत्नीशी संबंध होते. जेव्हा ब्रेंटला हे समजले तेव्हा त्याने त्याचे २३ वर्ष जुने लग्न मोडले, तर टोनी पार्करच्या पत्नीनेही त्याला घटस्फोट दिला.

इंग्लंडचा फुटबॉलपटू जॉन टेरीने त्याचा मित्र वेन ब्रिजेसची फसवणूक केली. जॉन टेरीचे वेन ब्रिजेसची मंगेतर व्हेनेसा पेरोसेलशी नाते आहे. वेन ब्रिजला याची माहिती मिळताच त्याने आपल्या मंगेतर आणि मित्रासोबतचे नाते संपवले.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातून अपहरण झालेला डुग्गू अखेर १० दिवसांनी सापडला; ३०० पोलीस घेत होते शोध
आपल्या ‘या’ गर्लफ्रेंडसाठी सलमानने धरले होते सुनील शेट्टीचे पाय; वाचा पुर्ण किस्सा
पारनेरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची काटे की टक्कर; जयश्री औटींचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी
शेवटी ते आबांचच रक्त…! विरोधकांचा धुव्वा उडवल्यावर रोहीत पाटलांचे पवारांकडून तोंडभरून कौतूक

क्राईम खेळ

Join WhatsApp

Join Now