Share

Prisoner: कैद्याच्या पोटाचा एक्सरे काढताच आढळले तब्बल ५ मोबाईल, डॉक्टरही झाले हैराण, वाचा घटनाक्रम

mobile

कैदी (Prisoner): सध्याच्या जगात कल्पनेपलीकडच्या गोष्टी घडत आहेत. मनुष्याचं मन सर्वात वेगवान आहे असं म्हणतात, त्यामुळे मनुष्य काहीही कल्पना करू शकतो. पण असल्या विचित्र गोष्टी कल्पनेतही करणार नाही. अशीच एक घटना समोर आली आहे ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. जेलमधील एका कैद्याच्या पोटात एक नाही, दोन नाही तर तब्ब्ल ५ मोबाईल सापडले आहेत.

या घटनेमुळे सर्वजण हवालदिल झाले आहे. नेमके या कैद्याच्या पोटात मोबाईल गेले कसे याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे. मागील वर्षी सुद्धा अशीच एक घटना घडली होती. पण त्या व्यक्तीने एकच मोबाईल गिळला होता. काही दिवसांनी त्याला पोटाचा त्रास व्हायला लागला तेव्हा उघडकीस आले की, त्याने मोबाईल गिळला आहे.

नंतर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातील मोबाईल बाहेर काढण्यात आला. त्याच घटनेची पुनरावृत्ती तिहार कारागृहातील जेल नंबर १ मध्ये झाली. ही घटना अशा जेलमधील आहे, जिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा असते. या कैद्यावर खून आणि दरोडा असे गुन्हे होते. याच गुन्ह्याच्या तारखेवर जाण्यासाठी कैदी बाहेर पडला होता. तिकडूनच तो ५ मोबाईल गिळून तुरुंगात आला.

कारागृहाच्या गेटवर त्याची झडती घेत असताना तो अडकला. तुरुंगात जात असताना तो पोटात अडकलेला मोबाईल काढण्याचा प्रयत्न करत होता, तितक्यात त्याला पकडण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कैद्याला कारागृहातील इतर कैद्यांना मोबाईल विकून पैसे कमवायचे होते, म्हणून ते मोबाइल आणण्यात आले होते. कैद्याच्या पोटातील हे मोबाईल बाहेर काढणं अशक्य आहे.

कैद्याच्या पोटातून मोबाईल बाहेर कसे काढता येईल यासाठी विविध तज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेतले जात आहे. कैद्याने पोटातील मोबाईल काढण्याकरिता अनेक प्रयत्न केले पण त्याला ते जमले नाही. काही दिवसांनी त्याला त्रास व्हायला लागला. नंतर त्याने कारागृहातील अधिकाऱ्याला सांगितले की, माझ्या पोटात ५ मोबाईल आहे.

अधिकारी हसून त्याला म्हणाला की, तुला पळून जायचे असेल तर जा, पण असे जोक करू नको. नंतर त्याने गांभीर्याने सांगितल्यानंतर अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले. त्यांनतर सरकारी रुग्णालयात कैद्याच्या पोटाचा एक्सरे करण्यात आला. त्यात माहित झाले की, कैद्याच्या पोटात ५ मोबाईल आहेत. कीपॅडचे छोटे मोबाइल एक्सरेमध्ये दिसून आले.

यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. माणूस मोबाईलला गिळू शकतो यावर विश्वासच बसत नाही. याआधीही अनेक प्रकरणं अशी घडली आहेत. पण त्यात एकच मोबाईल असायचा त्यामुळे तो काढणे शक्य झाले. आता एवढे मोबाईल पोटातून काढायचे कसे, हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान आहे.

महत्वाच्या बातम्या
Shah Rukh: एकतर्फी प्रेमात शाहरूखने अंकिताला जिवंत जाळलं, संतप्त लोकांनी केली निदर्शने, वाचा काय घडलं?
Hardik Pandya: यावेळी हार्दिक पांड्याने वाचवलं, पुढच्या वेळी अशी चूक करू नकोस, चाहत्यांनी विराटला फटकारलं
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून मुसळधार पाऊस; वाचा पंजाबराव डख यांचा अंदाज
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा मुलगा १० व्या वर्षी बनला बिझनेसमन, वडील राज कुंद्रासोबत करणार ‘हे’ काम

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now