Share

देशात आढळला जगातील सर्वांत दुर्मिळ ब्लड ग्रुप; ‘असा’ ब्लड ग्रुप असणारी देशातील ‘ही’ पहिलीच व्यक्ती

मानवी शरीरात चार प्रकारचे रक्तगट आढळून येतात. या प्रत्येक रक्तगटाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, किंवा इतर कारणांमुळे शरीरातील रक्त कमी झाले तर ते भरण्यासाठी व्यक्तीच्या शरीरातील रक्तगट कोणता याची माहिती घेऊन तसे रक्त भरले जाते.

मानवी शरीरात A, B,O आणि AB असे चार प्रकारचे रक्तगट आढळतात. यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे उपप्रकार असतात. व्यक्तीच्या शरीरात असणाऱ्या रक्ताच्या प्रकारानुसार रक्त भरलं जातं. मात्र, आता अशी एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या शरीरात या चार रक्तगटाव्यतिरिक्त वेगळाच रक्ताचा प्रकार आढळला आहे.

शरीरात वेगळा रक्तगट आढळणारा हा व्यक्ती गुजरातमधील असून, तो ६५ वर्षांचा आहे.  हा व्यक्ती हृदयविकाराचा रुग्ण आहे. या व्यक्तीचा रक्तगट A,B,O किंवा AB यापैकी कोणताही आढळला नाही. या व्यक्तीचा ब्लडगृप EMM निगेटिव्ह असा आहे.

साधारणपणे मानवी शरीरात  A,B,O किंवा AB  हे चार रक्तगट आढळून येतात. तसंच EMM चं प्रमाण जास्त असलेले ३७५ अँटिजेन आहेत. मात्र जगात असे फक्त १० व्यक्ती आहेत, ज्यांच्या रक्तात EMM असलेले अँटिजेन नाहीत.

ज्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तात EMM असलेले अँटिजेन नाहीत. तो व्यक्ती इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यामुळे असा रक्तगट असलेले लोक ना रक्त देऊ शकतात ना कोणाकडून रक्त घेऊ शकतात. आत्तापर्यंत अशा EMM निगेटिव्ह ब्लडगृपचे ९ लोक सापडले होते.

मात्र, आता गुजरात मधील या व्यक्तीमुळे असा ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांची संख्या १० झाली आहे. या व्यक्तीचा ब्लडगृप हा जगातला सर्वात दुर्मीळ रक्तगट आहे. अशा प्रकारचा ब्लड गृप असलेली ही जगातली दहावी आणि देशातली पहिलीच व्यक्ती आहे.

इतर आरोग्य

Join WhatsApp

Join Now