Share

लिलावात विकला गेला जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा, किंमत वाचून डोळे होतील पांढरे

हिऱ्यांचा विचार केला तर त्याच्या किमतीची चर्चा नक्कीच होते. लोकांमध्ये त्याची वेगळीच क्रेझ आहे. यामुळेच डायमंडच्या दागिन्यांची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु लोक दागिन्यांसह डायमंड खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक याविषयी किती उत्सुक आहेत, याचा अंदाज यावरून लावता येतो की, जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा ‘द रॉक’ १ अब्ज ६९ लाख रुपयांना ($२१.९मिलियन) विकला गेला आहे.(The world’s largest white diamond sold at auction)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या डायमंडचे वजन २२८.३१ कॅरेट आहे. हिरा कोणी विकत घेतला याची माहिती आयोजकांनी दिलेली नाही. या खरेदीत ५ जण सहभागी झाल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले आहे. यापैकी ३ खरेदीदार अमेरिकेतील होते, तर २ मध्य पूर्वेकडील होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्वांची नावे आयोजकांकडून गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हिरा २००० च्या सुरुवातीला खाणकामातून बाहेर आला होता. तो आधी ज्वेलरी कलेक्शनने विकत घेतला होता. त्यानंतर त्याने त्याचा वापर नेकलेसमध्ये केला. आता ८ वर्षांनी त्यांनी ते विकले आहे. हा हिरा दुर्मिळ असल्यानं त्याला खूप मागणी असल्याचं सांगण्यात येत आहे.

हा नाशपातीच्या आकाराचा पांढरा हिरा गोल्फच्या चेंडूइतका मोठा आहे. क्रिस्टीच्या दागिने विभागाचे प्रमुख मॅक्स फॉसेट यांनी सांगितले की, “हा पूर्णपणे नाशपातीच्या आकाराचा आहे.” अशा मोठ्या स्टोन्सचे वजन टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा आकारात काही कपात करावी लागते. हे जगातील दुर्मिळ रत्नांपैकी एक आहे ज्याचा लिलाव झाला आहे.

लिलावापूर्वी हा हिरा २ अब्ज ३२ कोटी रुपयांपर्यंत विकला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र त्याची बोली अपेक्षेपेक्षा थोडी कमी झाली आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हा हिरा पहिल्यांदा न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर दुबई आणि तैपेई येथेही त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले. यानंतर त्याच्या लिलावाबाबत सातत्याने बातम्या येत होत्या. खूप दिवसांपासून लोक याची वाट पाहत होते. अखेर ११ मे रोजी मालकाने त्याचा लिलाव केला.

महत्वाच्या बातम्या-
पैशांसाठी काहीही करणार का? आलिया भट्टच्या त्या जाहिरातीमुळे नेटकऱ्यांनी केलं तुफान ट्रोल
तीन महिन्यात पालटले मजुराचे नशीब, खाणीत सापडला दुर्मिळ हिरा, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
शाहरूख खान आणि हिरानींच्या डंकी च्या सेटवरचा पहिला फोटो आला समोर, असा असेल नजारा
मालाबार गोल्डच्या नवीन जाहिरातीमुळे नेटकरी संतापले, होतेय बहिष्कार टाकण्याची मागणी

ताज्या बातम्या आर्थिक इतर

Join WhatsApp

Join Now