34 years of imprisonment: सामान्य माणसांना विशिष्ट गुन्हा केला असेल तर तुरुंगवास होतो. मात्र ही घटना ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. एका महिलेला फक्त एक ट्वीट केल्यामुळे ३४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. ही भयंकर घटना सौदी अरेबियात घडल्याचे समोर येत आहे. याही पुढे जात न्यायालयाने त्या महिलेबाबत एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
सलमा अल-शेहबाब या महिलेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सौदी अरेबियातील महिलांच्या हक्कांसंदर्भात अनेक ट्विट केले होते. त्यामुळे देशात अशांतता पसरत असल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. सौदी अरेबियातील फौजदारी न्यायालयाने तिला ३४ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे.
सलमा या महिलेने तुरुंगात असलेल्या कार्यकर्त्या लुजैल अल-हाथलौल यांच्यासह इतर अनेक महिला कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. त्यांची वकिली केली होती. त्यामुळे अशांतता पसरवण्याचा आरोप देखील तिच्यावर होत होता.
मात्र तिने केलेल्या ट्विटची गंभीर दाखल सौदीच्या फौजदारी न्यायालयाने घेतली असून तिला ३४ वर्षांचा तुरुंगवास व तुरुंगातून बाहेर आल्यावर पण ३४ वर्षे प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सलमा या महिलेला २ मुलं आहेत. ४,६ वयोगटातील या लहान मुलांना आता त्यांच्या आई पासून दूर राहावे लागणार आहे.
सलमाला २०२१ मध्ये अटक करण्यात आली. ती तेव्हाच सौदी अरेबियात आली होती. त्या आधी सलमा युकेमध्ये राहत होती. व त्या ठिकाणी लीड्स युनिवर्सिटीत पीएचडी करत होती. सलमा शिया मुस्लीम आहे.
सलमाने केलेल्या ट्विटमुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत सौदी अरेबियाच्या फौजदारी न्यायालयाने सलामावर ही गंभीर कारवाई केली आहे. सलमा या महिलेला आधी ६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र नंतर न्यायालयाने त्या शिक्षेत वाढ केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांची ‘दादा’ स्टाईल प्रतिक्रिया; आतापर्यंतचं सगळंच काढलं, कंबोजांची कुंडली मांडली!
शिंदे सरकारच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टात नागरिकांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल
…तर पत्नी पतीला घराबाहेर हाकलून देऊ शकते; न्यायालयाचा महत्वाचा निर्णय