Share

तिसरे अपत्य असल्यामुळे महिलेला गमवावी लागली सरकारी नोकरी, न्यायालयाने दिला मोठा निर्णय

मुंबई। ‘हम दो हमारे दो’ तसेच ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ या तत्वावर सरकारने अनेक नियम काढले आहेत. वाढती लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी तसेच बेरोजगारी टाळण्यासाठी यांसारख्या अनेक योजनांना सरकारने प्राधान्य दिले आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना दोनच अपत्यांचा नियम लागू करण्यात आला आहे. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना अनेक सवलतीतून वगळण्यात येत आहे.

एखाद्या दाम्पत्याला तीन अपत्ये असतील आणि त्यांनी एक अपत्य दुसऱ्याला दत्तक दिले असेल तरी, ते दाम्पत्य सरकारी सेवेसाठी अपात्र ठरते. असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी दिला आहे.

दरम्यान, वडिलांच्या जागी आपल्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भात एका महिलेने केलेला अर्ज एमआयडीसीने (MIDC) २०१९ मध्ये फेटाळला होता. सरकारी कर्मचाऱ्यांना दोन अपत्यांचा नियम लागू असल्याने, त्या नियमाचा भंग केल्याने एमआयडीसीने संबंधित महिला वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी करण्यास पात्र नसल्याचे म्हटले आहे.

वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर तिसरे अपत्य असलेल्या महिलेला नोकरी देण्यास एमआयडीसीने दिलेला नकार उच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. दरम्यान, संबंधित महिलेच्या वडिलांचा एका आजाराने मत्यू झाला. या महिलेचा भाऊ दत्तक दिला असला तरी सरकारी कर्मचाऱ्यांना दोन अपत्यांचा नियम लागू होतो. असे न्यायालयाने म्हणत महिलेला दिलासा देण्यास नकार दिला.

मात्र, संबंधित महिलेने आपण ही नोकरी करण्यास पात्र असल्याचे म्हटले आहे. संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, मी माझ्या आई-वडिलांचे दुसरे अपत्य आहे, असे मानले जाऊ शकते. कारण मला जुळे भावंड आहे. मात्र, जुळ्या भावंडांपैकी दुसरे अपत्य म्हणून मला मानण्यास काहीच हरकत नाही.

मात्र, तिला आणखी एक लहान भाऊ आहे. तिने नोकरीसाठी अर्ज करताना ही बाब लपवली होती. त्यामुळे तिचा अर्ज फेटाळण्यात आला, असे एमआयडीसीने म्हटले आहे. मात्र संबंधित महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असे म्हंटले आहे की, मी अर्ज करण्यापूर्वीच माझ्या लहान भावाला कायदेशीररीत्या दत्तक देण्यात आले आहे. त्यामुळे तो आता माझ्या कुटुंबाचा भाग नाही.

दरम्यान, सरकारी नियमानुसार, तसेच अधिसूचनेत सांगितल्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा अधिक अपत्ये असू नये, हा या अधिसूचनेचा हेतू आहे. तरीही सरकारी कर्मचाऱ्याने तिसरे अपत्य जन्माला घातलेच, तर त्याला कोणतेही लाभ दिले जाऊ शकत नाहीत. तसेच, त्यात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याच्या लाभाचाही समावेश होतो. असे न्यायालयाने म्हटले आहे.

ही अपात्रता चौथ्या अपत्याच्या कारणास्तव आहे. त्याला दत्तक घेतले आहे की नाही, हा मुद्दा नाही. त्यामुळे अधिसूचना लागू होत नाही, असे होत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने संबंधित महिलेला दिलासा देण्यास नकार दिला. तसेच त्यांचा अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:
प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता तीन राज्यांत ‘द काश्मिर फाईल्स’ करमुक्त, चित्रपटाने केली छप्परफाड कमाई
..म्हणून फडणवीसांचं राजकारण म्हणजे गांडूच राजकारण; प्रकाश आंबेडकरांची जहरी टिका
आमदार झाल्यानंतर सर्वात आधी विरोधी पक्षातील उमेदवाराचे घेतले आशिर्वाद, होतोय कौतुकाचा वर्षाव
बच्चन पांडे बनताना अक्षय कुमारची लागायची वाट; तब्बल ‘इतके’ तास लागायचे मेकअप करायला

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now