नरेंद्र मोदी (Narendra Modi): आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या बालकांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदींच्या वाढदिवसानिमित्य १७ सप्टेंबर ते २ आक्टोबर सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मोदींना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक प्रकारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावच केला आहे.
यात वेगळे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांनी मोदींना लक्षवेधी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केलंय की, “गेल्या साडे सहा दशकातील चुका दुरुस्त करून, धाडसी निर्णय घेऊन, हिंदुस्थानाला श्रेष्ठत्त्व मिळवून देण्यासाठी अविरत मेहनत करणारे, आपले पंतप्रधान नरेंद मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
गेल्या साडेसहा दशकातील चुका दुरुस्त करून, धाडसी निर्णय घेऊन, हिंदुस्थानाला श्रेष्ठत्व मिळवून देण्यासाठी अविश्रांत मेहनत करणारे, आपले पंतप्रधान @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.#yugpurush pic.twitter.com/Gims3dkaef
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 17, 2022
अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान मोदींना खास शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, एकनाथ शिंदेनी काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या, तर शिंदे भाजपमध्ये एन्ट्री करणार का?
मोदींच्या वाढदिवशी ही वेगळीच चर्चा सुरु झाल्याने सोशल मीडियावर अनेक कंमेंट्स केल्या जात आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जर ठाकरेंना मिळाले तर शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना शुभेच्छा देत ट्विट केले की, “भारताचे वैश्विक नेतृत्त्व, राष्ट्र विकासाचे कर्तृत्त्व, देशाला लाभलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व, आमचे राष्ट्रनेते देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या वतीने वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.” फडणवीसांनी मोदींचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीसुद्धा पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. निरोगी आरोग्यासह, अतुलनीय परिश्रम, समर्पण आणि सर्जनशीलतेने तुम्ही राबवत असलेली राष्ट्रनिर्मितीची मोहीम तुमच्या नेतृत्त्वाखाली अशीच प्रगतीपथावर राहावी असे म्हणत त्यांनी ट्विट केले. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छा चांगल्याच चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या
Nagpur Medical: आई बापानं सलग २४ तास अंबू बॅगनं कृत्रिम श्वास दिला; शेवटी मुलीचा व्हेंटिलेटरअभावी तडफडून मृत्यू
विरोधकांनाही आवडतात मोदींच्या ‘या’ गोष्टी; जगभरातील लोकं त्यांना का पसंत करतात? जाणून घ्या गुपित
Sharad pawar : पवारसाहेब देशाला घडविणारा नेता; राणेंना भाजपच्याच नेत्याने तोंडावर आपटवले
bachchu kadu : शिंदेंची डोकेदुखी वाढणार! बच्चू कडूंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय? वाचा नेमकं काय म्हंटलंय बच्चू कडूंनी?