बाजारात इलेक्ट्रिक वाहनांसोबत सीएनजी वाहनांची ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानुसार ग्राहकांची मागणी बघता वाहनांचा पुरवठा देखील वाढविण्यात आला आहे. अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी सीएनजी वाहनांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सीएनजी वाहनांचे वेगवेगळे मॉडेल दररोज बाजारात आणले जातात.
नुकतेच ह्युंदाई आणि मारुती सुझुकीसोबत टाटा मोटर्सने सीएनजी वाहनांमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी आपल्या डिझायर कारचे सीएनजी व्हेरीयन्ट लॉन्च करणार असल्याचे समोर आले आहे. सांगण्यात येत आहे की, मारुती सुझुकीच्या काही डीलर्सकडे आगमन होणाऱ्या सीएनजी कारची बुकिंग सुरू झाली आहे.
ग्राहकांनी सीएनजी वाहनांना मोठी पसंती दाखविल्यामुळे यावर ऑफर्सही देण्यात आले आहेत. यापूर्वी मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात सेलेरियो कारचा सीएनजी व्हर्जन लॉन्च केला होता. मारूती सुझुकी महिन्याला 10000 पेक्षा जास्त युनिटची विक्री करत असल्यामुळे कंपनीला याचा चांगला फायदा होतो.
डिजायर कारच्या विक्रीत सेट 46 टक्क्यांत पेक्षा जास्त वाढ झाल्याने साडे सतरा हजार युनिटची विक्री करण्यात आली आहे. मारुती सुझुकी लवकरच डिझायर कारचा सीएनजी व्हेरीयन्ट लॉन्च करणार आहे. यासाठीची पुर्व तयार कंपनीने करण्यास सुरुवात केली आहे.
सीएनजी व्हेरीयन्टची शोरुम किंमत 8.82 लाख इतकी आहे. परंतु बाजारात आल्यावर याची किंमत उतरुन 8.14 लाख होणार आहे. मारुती सुझुकीने डिझायर सीएनजी सेडान देखील सबस्क्रिप्शन मॉडेलवर उपलब्ध करून दिली आहे. मारुती सुझुकीने म्हटले आहे की, डिझायर सीएनजी मॉडेलसाठी मासिक फि 16,999 रुपयांपासून सुरू असेल.
पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीला स्वच्छ इंधन मानले जाते. तसेच CNG पेट्रोल आणि डिझेलपेक्षा चांगले मायलेजही देते. याचा फायदा कार मालकाला होतो. मारुती सुझुकीचा दावा आहे की, डिझायर सीएनजी प्रकार लॉन्च करणे हे तेल आयात कमी करण्याच्या आणि भारताच्या प्राथमिक ऊर्जा मिश्रणातील नैसर्गिक वायूचा वाटा करण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
महत्वाच्या बातम्या
काॅंग्रेसचा पराभव का झाला? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितली ‘कारणे’; पक्षाच्या चुकाही दाखवल्या
आमच्यापेक्षाही वाईट हाल तुमचे पंजाबात झालेत, तिथं विजय मिळवून दाखवा; शिवसेनेचे भाजपला आव्हान
शिवसेनेपेक्षा माझा पक्ष स्ट्राॅंग; रामदास आठवलेंनी पुराव्यासह केले सिद्ध