Share

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “याची तर तोंड दाखवायची लायकी नाही”

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे मागील अनेक दिवसांपासून नेहमी चर्चेत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे दोघेही चर्चेत येतात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, मागील वर्ष कुंद्रा आणि शेट्टी परिवारासाठी खूप कठीण काळ होता. मात्र या कठीण काळातून संपूर्ण परिवार सुखरूप बाहेर पडले आहे. याच दरम्यान राज कुंद्रा हा जेलमध्ये होता.

तसेच राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यापासून मीडियासमोर खूप कमी वेळा दिसून आला आहे. मात्र नुकताच तो चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्याच दरम्यान सिनेमा हॉलबाहेर तो स्पॉट झाला. याच वेळी त्याने जे काही स्वतःचे रुप दाखवले की सगळेच अचंबित झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळेस राज कुंद्रा चेहरा न दाखवता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. ते ही त्याच्या अतरंगी स्टाइलमुळे.

राज कुंद्रा देखील अशाच एका फॅशन सेन्समुळे सध्या चर्चेत आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी देखील राज कुंद्रा नेहमी चर्चेत होता. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने मीडियासमोर स्वतःला असा प्रकार आणला की, जो कोणी त्याला पाहिले तो थक्क झाला. तो खरंच राज कुंद्रा आहे यावर अनेकांना विश्वास बसतच नव्हता.

 

या व्हिडिओमध्ये त्याने काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे. तसेच त्याने डोळ्यांवर चष्माही लावलेला दिसत आहे. मात्र विशेष गोष्ट म्हणजे या जॅकेटने त्याने आपला संपूर्ण चेहरा झाकला होता. त्यामुळे त्याचा चेहरा कोणीही पाहू शकला नाही. तसेच हा व्हिडिओ नक्की राज कुंद्राच आहे का हे ओळखणे देखील कठीण आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

तसेच हा व्हिडिओ विरल भयानीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच व्हिडिओ पाहून नेटकऱ्यानी त्याच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाबद्दल ट्रोल करायला सुरुवात केली. या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, ‘असे काम करायचेच कशाला ज्यामुळे तोंड लपवायची वेळ येईल.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हा तर तोंड दाखवायच्या लायकीचा नाही.’ आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, ‘असली कामं केल्यावर तोंड लपवावेच लागेल ना.’

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, राज कुंद्राला मागच्या वर्षी जेल झाली होती. खरंतर, १९ जुलै २०२१ रोजी त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट बनवून प्रसारित केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. याच दरम्यान त्याने गेल्या दीड वर्षात १०० पेक्षा जास्त अश्लील चित्रपट बनवल्याचे समोर आले. या प्रकरणात जवळपास दोन महिने तुरुंगात होता. त्यानंतर त्याला सप्टेंबरमध्ये जामीनावर सुटका मिळाली.

 

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now