आपल्या उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोराने तिच्या मनमोहक कामगिरी आणि धमाकेदार नृत्याद्वारे चित्रपटसृष्टीत मोठे स्थान मिळवले आहे आणि आज तिच्याकडे कामाची कमतरता नाही. विशेष म्हणजे नोराची क्रेझ तरुणांपासून लहान मुलांपर्यंतही पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या गाण्यांवर लोक जोरदार नाचतात.(The video went viral when dancer Nora Fatehi was slapped by her mother)
नोरा फतेहीचे डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय तिचे हॉट आणि बोल्ड फोटोही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. दरम्यान, नोराचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिला तिच्या आईने मारहाण केलेली दिसत आहे. लग्नास नकार दिल्यानंतर तिच्या आईने तिला चप्पलने कशी मारहाण केली हे दाखवले.
नोराच्या आयुष्याशी संबंधित हा किस्सा पाहून तुम्हीही चकित व्हाल. नोराचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिची आई तिला लग्नासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ पाहण्याआधी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा व्हिडिओ नोराने स्वतः तयार केला आहे. यामध्ये दोन्ही भूमिका नोरा स्वतः साकारत आहे.
नोरा फतेही एकीकडे तिच्या स्टाईलमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे तिच आईच्या भूमिकेत दिसत आहे. लग्नावरून दोघींमध्ये वाद सुरू आहे. नोराची आई तिच्यावर लग्नासाठी दबाव आणते, तिला वेगवेगळ्या मुलांचे फोटो दाखवते, जे पाहून नोरा तोंड वाकड करते आणि प्रत्येक वेळी नाही म्हणते. नोरा व्हिडिओमध्ये नाही म्हणत डान्स करत असते.
नोरा डान्स मूव्ह करत असताना तिच्या आईच्या रागाचा पारा चढतो आणि ती तिला चप्पल मारू लागते. नोराच्या कॉमेडीचे लोक खूप कौतुक करत आहेत. नोराच्या नृत्यशैलीशिवाय लोक तिच्या विनोदाचेही चाहते झाले आहेत. हा व्हिडिओ 2017 सालचा आहे, मात्र तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हासू आवरणार नाही.
नोरा फतेहीने 2014 मध्ये ‘रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरवन’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘रॉकी हँडसम’, ‘सत्यमेव जयते’, ‘भारत’, ‘मरजावां’, ‘बाटला हाऊस’, ‘स्ट्रीट डान्सर 3D’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. नोरा प्रसिद्ध शो ‘बिग बॉस 9’ मध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली होती. यादरम्यान टीव्ही अभिनेता प्रिन्स नरुलासोबत त्याचे नाव खूप चर्चेत होते. यानंतर ती ‘कमरिया’, ‘साकी-साकी’ आणि ‘दिलबर-दिलबर’ सारख्या गाण्यांनी प्रसिद्ध झाली. नोरा तिच्या उत्कृष्ट नृत्यासोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
महत्वाच्या बातम्या-
नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले होते डिलीट, शेवटच्या पोस्टमध्ये लिहीली होती ही गोष्ट
जेव्हा शूटिंगच्या दरम्यान सर्वांसमोर निघाले होते नोरा फतेहीचे कपडे, अशी झाली होती तिची अवस्था
लग्नानंतरही नोरा फतेहीसोबत.., पायल रोहतगीने प्रिंस नरूलाची केली पोलखोल, प्रेक्षकही झाले अवाक
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या