विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं हे गुरू शिष्याचे असतं. विद्यार्थ्यांना योग्य वळण लावण्याचे आणि शिक्षित करण्याचे काम शिक्षक करत असतात. मात्र या घटनेत विद्यार्थी आणि शिक्षकाच्या पवित्र नात्याला काळिमा फासला गेला आहे. एका शिक्षिकेने तिच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांसोबत सामूहिक सेक्सचा व्हिडिओ काढून शेअर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संबंधित घटना ही तामिळनाडू मध्ये घडली आहे. यासंदर्भात मदुराई शाळेतील 42 वर्षीय शिक्षिका आणि तिच्या 39 वर्षीय प्रियकराला रविवारी अटक करण्यात आली असून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. दुसरीकडे मदुराई सायबर सेलच्या पोलिसांनी या व्हिडीओची चौकशी सुरू केली आहे.
माहितीनुसार, हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय पॉर्न साइट्सवर पैशांसाठी अपलोड करण्यात आला होता की काही निवडक लोकांमध्येच शेअर करण्यात आला होता. याबाबत सायबर सेल तपास करीत आहे. सायबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीजीपी कार्यालयाकडून अश्लील कन्टेंट शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने तीन 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांना तिच्या घरी बोलवले, त्यानंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या महिला शिक्षिकेचा पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर तिचे एका व्यावसायिकासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
याच व्यावसायिकाने संबंधित शिक्षिकेचे आणि विद्यार्थ्यांचे व्हिडीओ त्याच्या काही मित्रांमध्ये शेअर केले होते. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झाले. याची पीडित अल्पवयीन मुलांना माहिती झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर शिक्षिकेला आणि तिच्या प्रियकर व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे.
या दोघांवर पोक्सो कायद्याच्या कलम 5(1), 5(एन) आर/डब्ल्यू 6, आयपीसीच्या कलम 292(ए), 506 आणि आयटी कायद्याच्या कलम 67(ए) आणि 67 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, अश्लील मजकूर प्रसारित करणे तसेच गुन्हेगारी धमकी देणे असे आरोप लावण्यात आले आहेत.