भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली होती. विनोदने त्याच्या इमारतीच्या गेटवर गाडी धडकवल्याने त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर त्याची सुटका झाली. मात्र त्या दिवशी विनोद कांबळे नेमक्या कोणत्या अवस्थेत होते याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विनोद कांबळी वांद्रे येथे ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीच्या गेटवर त्याची गाडी आदळली. यावरून विनोदचा इमारतीतील वॉचमन आणि तेथील रहिवाशांसोबत वाद झाला. हा किरकोळ वाद इतक्या टोकाला गेला की इमारतीमधील रहिवाशांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती.
त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध वेगाने गाडी चालवणे, लोकांचा जीव धोक्यात घालणे त्याच बरोबर इमारतीच्या संपत्तीला धोका पोहोचवणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. विनोदची गाडी जेव्हा इमारतीच्या गेटला आदळली होती तेव्हा त्याने मद्यपान केले होते असे पोलिसांनी म्हटले होते.
आता या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यावरून विनोद कांबळेची त्या दिवशी काय अवस्था होती हे सर्वांपुढे आले आहे. लाल शर्ट आणि हाफ पँट घातलेला विनोद या व्हिडीओमध्ये दिसत आहे. घटनेच्या वेळी विनोद फुल दारूच्या नशेत असलेले पाहिला मिळत आहे.
दारूच्या नशेत विनोद कांबळीची समोरून येणाऱ्या कारला धडक; VIDEO समोर pic.twitter.com/ges0rEWVBc
— News18Lokmat (@News18lokmat) March 2, 2022
दारूच्या नशेत असताना तो सोसायटीच्या बाहेर जातो, रस्त्यावरील कारला धडकतो. यावेळी विनोद व्यवस्थित चालू देखील शकत नव्हता. त्यानंतर तो सोसायटीच्या सदस्यांशी आणि कारमालकाशी वाद घालताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडीओत तो पार्किंग मध्ये असून, पोलिसांसोबत असल्याचे दिसत आहे.
दारूच्या नशेत विनोद कांबळीची समोरून येणाऱ्या कारला धडक; VIDEO समोर pic.twitter.com/va56MhrWcl
— News18Lokmat (@News18lokmat) March 2, 2022
लाल शर्ट आणि हाफ पँट घातलेला विनोद या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसत आहे. विनोद संपूर्ण दारूच्या नशेत असून तो त्या अवस्थेतच सोसायटीच्या बाहेर जातो आणि रस्त्यावरील कारला धडकतो. विनोदला नीट चालताही येत नव्हते. त्यानंतर या कारमालक आणि काही सदस्यांशी घालताना विनोद दिसत आहे. तिसरा व्हिडीओ एका पार्किंगमधील असून त्यामध्ये विनोद पोलिसांसोबत दिसत आहे.