Share

पवनदीप आणि अरुणिता कांजीलालच्या अफेअरच्या चर्चांना उधाण, ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल

सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध शोपैकी एक शो म्हणून ‘इंडियन आयडॉल’ ला ओळखले जाते. या शोमध्ये अनेक स्पर्धक आपल्या गायनातील कौशल्य दाखवण्यास येतात. या शोचे आतापर्यंत १२ सीजन पूर्ण झाले आहेत. अनेक गायक या शोने घडवले आहेत. त्याचबरोबर या शोचा १२ वा सीजन काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. या पर्वाचा विजेता पवनदीप राजन झाला आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीत शांमुखप्रिया, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळी, मोहद दानिश हे स्पर्धक होते.

 

या शोमधील पवनदीप आणि अरुणिता यांची जोडी खूप गाजली होती. याच दरम्यान त्यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू होत्या. यांच्या आवाजासह यांची जोडी देखील खूप प्रसिद्ध झाली आहे. या शोमध्ये दोघांच्या गायनाची बरीच चर्चा झाली होती. तसेच यांच्या अफेयरच्या बातम्या देखील खूप आल्या होत्या. मात्र पवनदीप आणि अरुणिता यांनी अजूनही उघडपणे आपले प्रेम व्यक्त केले नाही. इतकेच नव्हे तर, या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले आहे.

 

या शोनंतर दोघांचे व्हिडिओ अल्बम देखील आले होते. अनेक व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहे. अनेक वेळा पवनदीप आणि अरुणिताचे रोमँटिक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही हात धरून लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पवनदीप आणि अरुणिताच्या फॅन पेजवर शेअर केले आहे.

https://www.instagram.com/reel/CaaIrS5js1-/?utm_medium=copy_link

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अरुणिताने ब्राऊन कलरचा वूलन ड्रेस घातला आहे. त्याचबरोबर काळया रंगाचे जॅकेट घातलेले आहे. तर पवनदीपने काळ्या शर्ट, डेनिम जीन्स आणि पांढऱ्या जॅकेट घातला आहे. या कपड्यात दोघेही खूप छान दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, हे दोघेही एकमेकांचा हात पकडून रस्त्यावरून जात आहेत.

 

त्याचबरोबर त्यांच्यासोबत एक कॅमेरामन देखील चालत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओवर कमेंट्स करत चाहते या दोघांबद्दलचे आपले प्रेम दाखवत आहेत. तसेच ‘अरुदीप’ साठी चाहते कायम सोबत राहण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पवनदीप हा मूळचा उत्तराखंडचा आहे. तर अरुणिता ही बंगाली आहे. दोघांची मैत्री ‘इंडियन आयडॉल १२’ च्या मंचावर झाली. सुरुवातीला दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. पण नंतर पवनदीपच्या बाजूने या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात होऊ लागले. मात्र अजूनही पवनदीपने कधीही कॅमेऱ्यासमोर आपले प्रेम उघडपणे व्यक्त केले नाही.

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now