नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या पाच राज्यांपैकी पंजाब सोडून, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर याठिकाणी भाजप सत्तेवर आला. उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ विजयी झाल्यानंतर निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस.व्हाय. कुरैशी यांनी एक मोठं विधान केलं आहे.
देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. वाय.एस. कुरैशी उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजप सरकार स्थापनेबाबत म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांचा विजय हा जातीयवादाचा विजय आहे. ध्रुवीकरण ही गेल्या वीस वर्षांपासून निवडणुकीची खेळी आहे. परिस्थिती अशी आहे की दोन मुलेही समोरासमोर भांडली तरी त्याला ध्रुवीकरण म्हणतात. यावेळी ते एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
म्हणाले की, सर्वात जास्त ध्रुवीकरण फाळणीच्या वेळी झाले. मग बाबरी विध्वंसाच्या वेळी आणि सध्या हा देशातील ध्रुवीकरणाचा तिसरा टप्पा आहे. देशातील जनतेचे जातीयीकरण वाढत आहे. हिंदु धर्मनिरपेक्ष असल्यामुळे भारत धर्मनिरपेक्ष आहे. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान मुस्लिम देश झाला पण भारत हा हिंदू देश न होता धर्मनिरपेक्ष देश झाला. मग सर्व काही सामान्य झालं. मला आशा आहे की ही वेळही लवकरच निघून जाईल.
त्यांना ईव्हीएम बद्दल विचारले असता म्हणाले, ईव्हीएम मध्ये जर गडबड झाली असती तर बंगालची निवडणूक भाजप हरली नसती, यासाठी मी ईव्हीएमला भरवशाचं मानतो. भाजपनं बंगालमध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती. त्यामुळे बॅलेटवर पुन्हा येण्याचा प्रश्नच नाही, आणि जर अजून काही पुष्टी करायची असेल तर VVPAT मोजून घ्यावं. असे कुरैशी म्हणाले.
हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मुस्लिम अनेक मुले जन्माला घालतात, असा अपप्रचार अनेक वर्षांपासून सुरू आहे. चार लग्ने करा. आम्ही पाच आमचे पंचवीस असा नारा दिला होता पण संशोधन तसे सांगत नाही.
सत्य हे आहे की मुस्लिमांमध्ये कुटुंब नियोजन सर्वात कमी आहे, परंतु त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. 1991 मध्ये हिंदूंची संख्या 300 दशलक्षाहून अधिक होती, ती आता 80 कोटींहून अधिक झाली आहे. मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त असेल असे तुम्हाला कुठे वाटते? असा त्यांनी प्रश्न केला.