युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यापासून रशिया जगभरातील लावलेले सारे निर्बंध झेलत आहे. अनेक देशांनी रशियावर आर्थिक आणि राजनैतिक निर्बंध लावले आहेत. जगभरातील मोठ्या कंपन्यानी तर रशियाविरोधात पाऊल उचलले आहे.(The US has made a mess of Russia)
‘रशियाकडून तेल आणि नैसर्गिक गॅस खरेदी करणे बंद करतील आणि रशियातील सर्व्हिस स्टेशनही बंद करतील.’, असे ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी शेलने म्हटले होते. यामुळे रशियाला मोठा झटका बसला आहे. अशातच अमेरिकेने रशियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रशियाचे टेन्शन अधिकच वाढले आहे.
अमेरिकेने रशियाकडून येणाऱ्या तेल आयातीवर बंदी घातली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या तेल आयातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून रशियाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आणखीन वाढवण्यासाठी अमेरिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
याबाबतची माहिती द असोसिएटेड प्रेसने दिली आहे. जागतिक निर्बंध – डेटाबेसने आज एक यादी जारी केली आहे. या यादीमध्ये युक्रेनच्या हल्ल्यानंतर सर्वात जास्त निर्बंध झेलणारा देश हा रशिया असणार आहे.
युक्रेनवर हल्ला होण्याच्या काही दिवसांपूर्वी २२ फेब्रुवारीपासून रशियाने संयुक्त राज्य अमेरिका आणि त्याचे यूरोपीय सहाकार्यांद्वारे लावलेल्या निर्बंधात वाढ झालेली पाहिले आहे, असे कॅस्टेलम डॉट एआयने म्हटले.
कॅस्टेलम डॉट एआय यांच्या म्हणण्यानुसार, २२ फेब्रुवारीच्या अगोदर रशियाविरोधात २ हजार ७५४ निर्बंध लावले होते. परंतु त्यानंतर जसेजसे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युद्धासंबंधित वक्तव्य केली तसतसे निर्बंध वाढू लागले आहेत. २ हजार ७७८ नवे निर्बंध रशियावर लावले गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
मासे खाणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी! माशांमध्ये सापडले प्लास्टिक; काळजी घ्या नाहीतर होतील ‘हे’ आजार
गावाकडच्या चार पोरांनी सुरू केली छोटी पानाची टपरी, आता उभे केले ३०० कोटींचे डेअरी साम्राज्य