Share

Shinde Group : शिरूर लोकसभा शिंदे गटाच्या वाट्यालाच पण उमेदवार आढळराव पाटील नसणार? केंद्रीय मंत्र्यांचे सुचक विधान

Shinde Group

Shinde Group : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यात भाजप आणि शिंदे गटाची युती झाल्यामुळे आता कोणत्या पक्षाचा उमेदवार कोणता मतदारसंघ लढवणार आहे याबाबत विचार सुरु आहे. यातच आता शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवता येणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसभेच्या १४४ मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपचे खासदार नाहीत त्याठिकाणी भाजपची विशेष तयारी सुरु आहे. त्यासाठी भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेमध्ये महाराष्ट्रात १६ तर पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ व शिरूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या अनुषंगाने केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी शिरूर मतदारसंघाचा तीन दिवसीय दौरा पूर्ण करत पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्या शिरूर मतदारसंघाबाबत बोलत होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघाची जागा शिंदे गटासाठी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार असतील का, याबाबत काहीच सांगता येणार नाही असेही त्यांनी सांगितले. याबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

ही माहिती देत त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे टेन्शन वाढवले आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याचे शिरूर येथील राष्ट्रवादीचे खासदार हे नागरिकांना केवळ टीव्ही स्क्रिनवर दिसत असतात. ते नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच या मतदारसंघात अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व प्रश्नांची यादी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सादर करणार आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी शिरूरच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार योगेश टिळेकर, धनंजय जाधव सुनील कर्जतकर, गणेश भेगडे इत्यादी मंडळी उपस्थित होती.

महत्वाच्या बातम्या
Johnson & Johnson : लहान बाळासाठी जाॅन्सन बेबी पावडर घातक; सरकारने कंपनीवरच आणली बंदी
Shivsena: तब्बल १२ वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या नेत्याला ठाकरेंनी हाकललं, शिंदेंनी मध्यरात्री ३ वाजता…. 
Gold ring: ‘या’ दिवशी जन्मणाऱ्या बालकांना मिळणार सोन्याची अंगठी; भाजप नेत्याची घोषणा
Mahavikas Aghadi : ..तर राज्यात महाविकास आघाडी लोकसभेच्या ३५ जागा जिंकेल, भाजपला मिळतील फक्त १३ जागा

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now