मागच्या काही महिन्यापासून औरंगाबादच्या नामांतराचा वाद चांगलाच पेटला आहे. तरी माविआ सरकारने जाता जाता औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले. त्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली. त्याचे पुन्हा छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले. (the rwo wheeler got stuck in the mud and the child died on his fathers hand)
परंतु या सगळ्या गदारोळात जिल्ह्याचे नाव बदलले असले तरी समस्या मात्र त्याच आहेत, अशी ओरड चहूबाजूंनी होत आहे. यातच जीवाला चटका लावणारी एक घटना औरंगाबादच्या गंगापूरमध्ये घडली. रस्त्यांची जी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे एका ८ वर्षाच्या लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला.
गंगापूरच्या लखिंपुर येथे राहणाऱ्या ८ वर्षीय कृष्णा परदेशी या लहान मुलाला त्याचे वडील बाबूलाल परदेशी मुलाच्या पोटात खूप दुखत असल्याने दवाखान्यात घेऊन चालले होते. पण रस्त्यामध्येच त्यांची गाडी चिखलात अडकली.
चिखलात अडकलेल्या टू व्हीलर गाडीला काढण्यात खूप वेळ गेला, पण ती निघत नव्हती. त्यावेळी कृष्णाच्या पोटात दुखत असल्याने त्याला खूप वेदना झाल्या. शेवटी उपचाराअभावी त्या लहान चिमुरड्याने वडिलांच्या डोळ्यासमोर जीव सोडला.
या दुर्दैवी घटनेमुळे परदेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुविधांची दुरावस्था असल्यामुळेच ८ वर्षाच्या लहान कृष्णाला आपला जीव गमवावा लागला. यामुळे स्वतःचे लेकरू जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, दुःख काय असतं, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
या घटनेनंतर संपूर्ण गावात शासकीय यंत्रणा, राजकीय नेते, अधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. स्वतःच्या राजकारणासाठी नामांतराचा प्रश्न उचलून धरणारे राजकीय नेते लोकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी भूमिका घेताना, त्यांना सुविधा उपलब्ध करून देताना दिसत नाहीत,अशी खंत लोकांकडून व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिंदे सरकारची बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर!; या विभागांसाठी दर महिन्याला १ लाख कर्मचारी भरती
कारगिल युद्धावेळी कोणत्याही पदावर नसतानाही मोदी गेले होते थेट युद्धभूमीवर; अस्सल पुरावा आला समोर
होय माझ्यावर दबाव आहे, संकट असेल तर कुणीही सेफ व्हायचा प्रयत्न करेल – अर्जून खोतकर






