उडत्या विमानात दोन भावांनी एकमेकांवर केली लघवी, त्रासलेल्या पायलटनं उचललं धक्कादायक पाऊल

सोशल मीडियावर एक बातमी सध्या खूप व्हायरल होत आहे. त्या बातमीनुसार २ भावांनी उडत्या फ्लाईटमध्ये मोठा गोंधळ घातला. ते दोघेही नशेत होते. त्या दोघांमध्ये भांडण झाली. ते भांडण इतके टोकाला गेली की, त्यातल्या एका भावाने दुसऱ्याच्या भावाच्या अंगावर लघवी केली. चालत्या विमानात हा घाणेरडा प्रकार घडला. या बातमीने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. (The two brothers urinated on each other on the plane..)

या बातमीनुसार, हे प्रकरण १२ मे रोजी घडले आहे. जेट २०० विमान लंडनमधील स्टॅनस्टेड विमानतळावरून ग्रीसमधील क्रेते देशासाठी रवाना झाले होते. दोघे भाऊ दक्षिण पूर्व लंडनमधील रहिवासी आहेत. हा किळसवाणा प्रकार जेट २ एअरलाईन्सच्या विमानात घडला.

अधिक माहितीनुसार, एअरलाईन्सने या दोन्ही भावांवर ४१ लाखांचा म्हणजेच तिथल्या चालनानुसार ५० हजार युरो इतका दंड ठोठावला आहे. त्यांना आयुष्यात कधीही जेट २०० विमानातून प्रवास करता येणार नाही. कडक नियमानुसार तशी बंदी घातली आहे.

२ भावांमध्ये भांडण झाली. हा घडलेला प्रसंग एका त्याच विमानात प्रवास करणाऱ्या त्यांच्या सहप्रवाश्याने त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या प्रवाश्याचे नाव एअरलाईन्सने गुप्त ठेवले आहे.

या २ भावांनी विमानात वाद घालण्यास सुरुवात केली. एकमेकांना मारहाण केली. त्यांचे भांडण इतके वाढले की, जेट २ एअरलाईन्सच्या पायलटने क्रेतऐवजी कॉर्फु शहरात विमान उतरवले, जेणेकरून या २ भावांना विमानातून खाली उतरवता येईल. त्या विमानातल्या २०० प्रवाश्यांना या गोंधळामुळे खूप त्रास झाला.

अधिक माहितीनुसार, ग्रीस पोलीस त्या २ भावांना विमानातून खाली उतरवून घेऊन जात आहेत, असे त्या व्हिडियोत दिसत आहे. जेट २ एअरलाईन्सच्या स्टाफला त्या दोघांच्या सीटखाली व्होडकाच्या रिकाम्या बॉटल सापडल्या. ते दोघे नशेत हा सर्व गोंधळ करत होते, हे यातून पोलिसांना स्पष्ट झाले.