पुणे | कोरोन व्हायरसचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने लॉकडाऊन उठवण्यात आला. लॉकडाऊननंतर खूप दिवसांनी सरकारने पर्यटनस्थळे पुन्हा पूर्वी प्रमाणे सुरु करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होतांना दिसत आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत आता प्रत्येक जन घराबाहेर पडून मोकळा श्वास घेत आहे. तसेच पर्यटनाची मजा लुटत आहेत.
तसेच, पर्यटनाच्या बाबतीत पुणेकर कधीच मागे हटत नाहीत. रविवार म्हंटल कि पुणेकरांसाठी फिरतीचा दिवस असतो. पुणेकर नेहमीच कोणत्या न कोणत्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देत असतात. त्यातही सर्वांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणजे गडकिल्ले.
मात्र हा सुट्टीचा दिवस पुणेकरांच्या जीवावर बेतणार ठरेल असा विचार कोणी स्वप्नातहि केला नसेल. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला पर्यटकांना नेहमीच आपल्या दिशेने खेचत असतो. दरम्यान, रविवारची सुट्टी असल्याने अनेक पर्यटकांनी शिवनेरीवर आपला मोर्चा वळविला होता. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली.
शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्रत्येकजण किल्ल्यावर मनसोक्त आनंद घेत होता. मात्र या आनंदाला कुणाची तरी नजर लागली असावी. कारण काही कळण्याआधीच शिवनेरीवरील मधमाश्यांनी पर्यटकांना घेरले व त्यांच्यवर हल्लाबोल केला. त्या मधमाशांच्या चाव्याने अनेक पर्यटक जखमी झाले.
या घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने या सर्व जखमी पर्यटकांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील जे काही पर्यटक किरकोळ जखमी झाले त्यांनी थेट आपले घर गाठले. तर, काही पर्यटक गडावरच अडकले.
दरम्यान रविवारची सुट्टी असल्याने शिवनेरी किल्यावर सुमारे २५० हुन अधिक पर्यटक आले होते. हा धक्कादायक प्रकार घडला कसा तर, आलेल्या पर्यटकांपैकी कुणीतरी मधमाशांच्या पोळ्यावर दगड फेकून मारला. त्यामुळे त्या आग्या मोलाच्या माशा चिडल्या आणि त्यांनी गडावर असलेल्या पर्यटकांच्या दिशेने हल्लाबोल केला. कुठल्यातरी एका पर्यटकाच्या चुकीची शिक्षा मधमाशांनी सर्वांनाच दिली.
महत्वाच्या बातम्या:
हास्यजत्रेच्या मंचावर येणार शेवंता, अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदाचं कॉमेडी करताना दिसणार
ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या चिमुकलीला स्वत:चे हेलिकॉप्टर देऊन नाना पटोले रेल्वेने मुंबईला रवाना
आमच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा आमदाराने पैशांचा घोटाळा केला तर.., अरविंद केजरीवाल यांचा इशारा
तिसरे अपत्य असल्यामुळे महिलेला गमवावी लागली सरकारी नोकरी, न्यायालयाने दिला मोठा निर्णय