Share

‘या’ दिवशी ठाण्याचा वाघ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘धर्मवीर’ची रिलीज डेट आली समोर

लोकांचा नेता,अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या टिझरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले व्यक्तिमत्व. तसेच ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे धर्मवीर. दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा “धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे” हा चित्रपट १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वाची  ओळख पहिली  तर ते कुणासाठी वडिलसमान होते, कुणासाठी मुलगा तर कुणासाठी भाऊ होते. ठाण्यातील महिलांच्या समस्या सोडवणारा, अपप्रवृत्तीपासून महिलांचं रक्षण करणारा आणि रक्षा बंधनाच्या वचनाला जागणारा असे हे समस्त महिला वर्गाचे भाऊ होते. एवढचं काय तर असं म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरून जायचे.

मनगटापासून ते अगदी खांद्यापर्यंत राख्या बांधलेल्या असायच्या. या सगळ्या राख्यात एक अतिशय हक्काची आणि लहानपणापासून त्यांच्या हातावर बांधली जायची ती राखी म्हणजे त्यांच्या सख्या बहिणीची अरूणाताईंची असायची.

नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा पार पडला. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या लूकमध्ये सर्वांसमोर हजर झाला. अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंची झलक बघून तर सर्वच जण अवाक् झाले आहेत.

केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेहऱ्यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं हुबेहूब साकारलं आहे की साक्षात दिघे साहेबच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय.

या सोहळ्याला अरुणाताईसुद्धा उपस्थित होत्या. प्रसादला या रुपात बघून त्या थक्क झाल्या. काही क्षणासाठी त्यांना वाटले आपला भाऊच समोर उभा राहीला आहे की काय. प्रसादला समोर बघून त्यांना अक्षरशः अश्रु अनावर झाले. त्यांच्या तोंडून शब्द फुटता फुटत नव्हते. वयाच्या पंचाहत्तरीत पोहचलेल्या अरुणा गडकरी आजही आपल्या या लाडक्या भावाच्या आठवणीने गहिवरून जातात.
महत्वाच्या बातम्या
प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या रुपात पाहून बहिण अरूणा यांना अश्रू अनावर, शब्दही फुटेना
बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरेंनी थेट नाव घेऊन सोडला बाण
उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? की शिवसैनिकांना वेगळा आणि ठाकरेंना वेगळा नियम आहे? 
आजही टेंभीच्या शाखेत आनंद दिघेंची ‘ती’ खुर्ची तशीच ठेवण्यात आली आहे, कारण…

बाॅलीवुड ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now