पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झाडूने कमालच केली आहे. याआधी एक्झीट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात आपचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर आपने घेतलेली आघाडी आता बहुमातांच्या फार पुढे गेली आहे.(The thing that BJP-Congress did not get)
राज्यात सत्ताधारी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या शिरोमणी अकाली दल यांना जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेस आणि अकाली दलाने गेल्या काही वर्षात राज्याची सत्ता मिळवली होती. मात्र यावेळी आपने सर्वांना धक्का दिला आहे. पंजाबमध्ये आपने मिळवलेल्या या यशाची ५ कारणे आहेत.
१ परिवर्तन
पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल- भाजप यांच्या आघाडीने आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता राखली होती. राज्यातील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार अकाली दलासोबत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मतदारांना काँग्रेस आणि अकाली दल एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे वाटले होते. मात्र यावेळी पंजाबमधील मतदारांनी परिवर्तनासाठी मतदान केले.
राज्यातील दोन मोठ्या पक्षांना जनतेने गेल्या ७० वर्षात सत्ता दिली आहे. मात्र जनतेला हवा असलेला विकास झाला नाही. त्यामुळेच यावेळी आपला मते मिळाली आहेत. यावेळी आम्ही फसणार नाही. भगवंत मान आणि केजरीवाल यांना संधी देऊ, अशी घोषणा आपने दिली आहे. मतदारांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. राज्यातील जनता आतापर्यंतच्या राजकारणाला कंटाळली होती.
२ दिल्ली मॉडेल
आपचे सर्वोच्च नेता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. यांनी पंजाबमधील मतदारांना दिल्ली मॉडलने प्रभावीत केले आहे. दिल्लीत दिले जाणारे शिक्षण, आरोग्य सेवा, कमी दरात वीज यामुळे संपूर्ण देशभरात त्यांच्या कामाची चर्चा आहे. पंजाबमध्ये वीजेसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. तर आरोग्य आणि शिक्षणाचे खासगीकरण होत आहे. अशाच दिल्ली मॉडेलने त्यांनी पंजाबच्या लोकांना आकर्षित केले आहे.
३ महिला एक स्वतंत्र वोट बँक
निवडणुकीच्या प्रचारात भाजपला राज्यातील युवक आणि महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. केजरीवालांनी स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचार नष्ट करण्याचे वचन दिले आहे. त्याचबरोबर शिक्षण आणि रोजगाराला चालना देणारी नवी व्यवस्था आणण्याचे आश्वासनदेखील दिले आहे. महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. महिलांकडे एक स्वतंत्र वोट बँक म्हणून आपने पाहिले आहे.
४ विरोधकांच्या मनातील प्रतिमा काढून टाकली:
भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून आपने बाहेरचा पक्ष अशी विरोधकांनी केलेली प्रतिमा काढून टाकली. राजकीय आणि सामाजिक घटनांवर भाष्य करणारे मान यांना पंजाबी लोकांच्या मनात खास स्थान आहे. त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे.
त्यासोबतच ते अन्य पारंपारीक राजकारणी लोकांपेक्षा वेगळे आहेत. एवढेच नाही तर मान भाड्याच्या घरात राहतात. गेल्या काही निवडणुकीत त्यांची संपत्ती कशी कमी होत चालली आहे. ही गोष्ट लोकांना खूप आवडली आहे.
५ शेतकरी आंदोलन
गेल्या एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने केंद्र सरकारला ३ वादग्रस्त कायदे मागे घेण्यास भाग पाडले आहे. या आंदोलनाचा देखील विधानसभा निवडणुकीवर परिणाम झाला आहे.