Saamana : राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेचा वाद आणखी वाढला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून दरवेळी भाजप आणि शिंदे गटावर टीका करण्यात येत असते. मात्र, आता याच सामनातून ठाकरे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साद घातली आहे. सामनातील अग्रलेखातून फडणवीसांना कटुता संपवा आणि कामाला लागा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामनातील अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरु आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? असा सवाल या अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले?
असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, असेही या लेखात म्हटले आहे. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!, अशी साद या अग्रलेखातून घातली गेली आहे.
पुढे या लेखात म्हटले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत सामोपचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले, अशी टीकाही या अग्रलेखात करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबुल केले. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.
तसेच शिवसेना नष्ट करण्यासाठी सर्व येरबाळग्यांची मोट बांधणे हा काही प्रामाणिकपणा नाही. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास विरोध करणे ही भूमिका इतर कोणी घेतली तर त्यास मान्यता असूच शकत नाही, पण फडणवीस यांच्यासारख्या शहाण्याने तशी भूमिका घेणे महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारे नव्हते.
खरी शिवसेना कोणती? हे फडणवीसांना पक्के माहित आहे व त्यांनी गळ्यात जी ‘खरी शिवसेना’ म्हणून धोंडा बांधून घेतला आहे तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे, हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत. पण त्यांचे शहाणपण कोठेतरी भरकटल्यासारखे झाले आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे. राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे, अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
zimbabwe : वर्षभरापूर्वी फाटके बुट घालून खेळला, आता पाकिस्तानविरुद्ध गाजवले मैदान; वाचा झिम्बाब्वेच्या ‘त्या’ खेळाडूबद्दल
akshay kumar : सूर्यवंशीच्या सेटवर अक्षय आणि रोहितमध्ये झाली होती हाणामारी, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
Aditya Thackeray : ‘आपले मुख्यमंत्री दहीहंडी, गणपती मंडळ अन् फोडाफोडी सोडून दुसरं काहीच करत नाहीत’
ajit pawar : टाटा-एअरबसवरून अजितदादा भडकले; राज्य सरकारचं भांडं फोडत केली शिंदे – फडणवीसांची बोलती बंद