कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू केले होते. परंतु हे निर्बंध न पाळल्यामुळे पोलिसांनी कित्येक विद्यार्थी आणि नागरिकांवर गुन्हे दाखल केले. मात्र आता हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
वळसे पाटील यांनी सांगितले आहे की, विद्यार्थी आणि नागरिकांवरील कोरोना काळात दाखल करण्यात आलेले गुन्हे कलम १८८ अंतर्गत मागे घेण्यात येणार आहेत. कोविडच्या काळात ज्या नागरिंक किंवा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पासपोर्ट मिळवताना, परदेशात जाण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे आम्ही तत्वत: १८८ अंतर्गत दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत. तसेच, “राजकीय किंवा बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे असतील तर ते मागे घेण्यासंबंधी निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हा प्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल त्यानंतर सरकार निर्णय घेईल आणि नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील,” अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत, यापूर्वी ज्या केंद्रिय यंत्रणाकडून कारवाया होत होत्या. त्याच्या प्रेसनोट काढण्यात येत नव्हत्या. किंवा कोणत्याही माध्यमातून ती माहिती बाहेर देत नव्हते. परंतु आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाणीपूर्वक माहिती बाहेर देत आहेत, त्यातून त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य केला जात आहे. हे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याच म्हटले आहे.
दरम्यान कोरोनाची स्थिती बघता राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक केले होते. मात्र तरी देखील मास्क न घालणे, ट्रिपसी जाणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे असे प्रकार नागरिकांकडून घडत होते. त्यामुळे यावर आळा आणण्यासाठी सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली.
यामध्ये जे नागरिक कोरोनाचे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. परंतु आता याच नागरिकांना परदेशी जाण्यासाठी तसेच सरकारी कामे करण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा विचार सरकार करताना दिसत आहे. याबाबतच लवकरच मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
पुष्पातील श्रीवल्ली दिसतेस म्हणत तरूणीला मारली मिठी अन्.., पुण्यातील खळबळजनक प्रकार
RRR साठी आलिया भट्ट नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला पहिल्यांदा आली होती चित्रपटाची ऑफर
‘आता गरिबांच्या पैशातून रस्त्यांची निर्मिती करणार’, नितीन गडकरींनी सांगितली योजना
कोरोना कॉलरट्युनपासून मिळणार सुटका, ‘या’ कारणामुळे सरकारने दिले बंद करण्याचे आदेश