गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षाणाच्या मुद्दयांवरुन खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले आहेत. शनिवारपासून संभाजीराजे भोसले मुंबईच्या आझाद मैदानात अमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असताना ठाकरे सरकारकडून चर्चेसाठी त्यांना निमंत्रण आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर तोडगा काढण्यासाठी आज वर्षा बंगल्यावर सकाळी ११ वाजता चर्चा होणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आपण इथे आहोत. मी मराठ्यांचा सेवक, पण बहुजनांचे नेतृत्व करतो आहे.
आमच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षणाच्या उपसमितीची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ वाजता बैठक होणार आहे. ही बैठक वर्षा बंगल्यावर पार पडेल. आरक्षणाचा लढा दिर्घकालीन आहे. त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी ६ मागण्या तरी कमीत कमी मार्गी लागाव्यात अशी अपेक्षा आहे.
यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, आज सकाळी अचानक माझी शुगर आणि रक्तदाब कमी झाला आहे. आमरण उपोषण करण्याची माझी इच्छा नाही. परंतु ज्याप्रमाणे महाराजांनी अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रमाणे मी सुध्दा प्रयत्न करत आहे. संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या अमरण उपोषणाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत आहे.
सध्या संभाजीराजे यांची तपासणी डॉक्टरांनी केली आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले आहे की, गेल्या ६० तासांपासून ते उपोषण करत आहेत. त्यामुळे त्यांची शुगर लेव्हल कमी झाली आहे. सोबतच त्यांचे ह्रद्याचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही त्यांना शुगर लेव्हल वाढवण्यासाठी इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे.
परंतु ते उपोषणाला बसल्याकारणाने इंजेक्शन घेण्यास नकार देत आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्दयाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरल्यामुळे सरकारने देखील आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या उपोषणादरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजनांची ब्लू प्रिंट द्यावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला तर..’, रोहित पवार राज्यपालांवर भडकले
मोठी बातमी! उपोषणामुळे संभाजीराजेंची प्रकृती बिघडली, डॉक्टरांना औषधे घेण्यास दिला नकार
‘2024 मध्ये दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार,’ शिवसेनेच्या वाघाने फोडली डळकाळी
‘पुष्पा’ च्या श्रीवल्ली गाण्यावर रितेश करत होता डान्स; जेनेलियाने हिमेश रेशमियाच्या गाण्याचा असा दिला तडका