Share

मालिका जिंकली तरी टिम इंडीयाचं ‘हे’ टेंशन मात्र वाढलंय; कर्णधार रोहीत शर्माची कबुली

भारताने रविवारी धर्मशाला येथे श्रीलंकेचा पराभव करून मालिका 3-0 अशी कौतुकास्पद कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ही सलग तिसरी मालिका क्लीन स्वीप आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिजनंतर आता श्रीलंकेचाही 3-0 असा पराभव केला आहे. पण या विजयानंतर टीम इंडियासमोर एक टेंशन उभं राहील आहे, याच कारण श्रेयस अय्यरची उत्कृष्ट खेळी आहे. कर्णधार रोहित शर्माने स्वतः ही गोष्ट मान्य केली आहे.(the tension of Team India has increased, confessed Rohit Sharma)

मालिका विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे, ज्याचा चांगला निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळाला आहे. आम्ही चांगला खेळ खेळला, मालिकेत आम्हाला अनेक सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. रोहित शर्मा म्हणाला की, या मालिकेत अनेक खेळाडूंना संधी मिळाली असून, यातील बहुतांश खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1497988369812320257?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1497988369812320257%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fstory%2Frohit-sharma-statement-on-shreayas-iyer-place-in-playing-11-virat-kohli-team-india-t20-tspo-1419259-2022-02-28

श्रेयस अय्यरच्या स्फोटक कामगिरीवर प्रश्न विचारला असता रोहित शर्मा म्हणाला की, हे आमच्यासाठी नवीन आव्हान आहे. पण संघासाठी ते अधिक चांगले आहे, परंतु अनेक खेळाडू सातत्यपूर्ण फॉर्ममध्ये असल्यास, आपल्याकडे नेहमीच ऑप्शन राहतात ही संघासाठी चांगली बाब आहे.

कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, खेळाडूंनी त्यांच्या जागेची चिंता करू नये, असा आत्मविश्वास त्यांना देणे आवश्यक आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचा नक्कीच चांगला फायदा करून घेतला आहे आणि म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवने संपूर्ण मालिकेत चांगल्या धावा केल्या होत्या, मात्र दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धची मालिका खेळू शकला नाही. या मालिकेत विराट कोहलीने विश्रांती घेतली, आणि म्हणूनच श्रेयस अय्यरला संधी मिळाली. गेल्या मालिकेत त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवता आले नव्हते. मात्र विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांचे पुनरागमन झाल्यावर श्रेयस अय्यरची जागा कशी होणार, हा संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय असेल.

श्रेयस अय्यरला श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने मालिकेत 3 सामन्यांच्या 3 डावात 3 वेळा नाबाद राहताना 174.35 च्या स्ट्राइक रेटने 204 धावा केल्या.  धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

महत्वाच्या बातम्या-
maruti suzuki baleno चे असे पाच फिचर्स जे तुम्हाला कोणत्याच कारमध्ये पाहायला मिळणार नाही
मी तुमच्याकडे पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि.., चंद्रकांत पाटलांचे पुणेकरांना आवाहन
कॉमेडी व्हिडिओ बनवून सोलापूरच्या गणेश आणि योगिताने कमावले पैसे; आता लोकांकडून येताय धमकीचे फोन
महेश भट फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना ड्रग्ज व पोरी पुरवतात; सुनेच्या गंभीर आरोपांनी उडाली होती खळबळ 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now