Share

ऑनलाईन क्लास दरम्यान शिक्षकाचे सुरू होते घाणरडे कारनामे; समोर येताच गमवली नोकरी

जगभरात कोरोना महामारीने प्रवेश केल्यानंतर सर्व शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोना महामारीचे सावट कमी झाले असताना देखील काही कॉलेज, महाविद्यालय ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. परंतु ही शिकवणूक सुरु असताना अनेक विचित्र प्रकार घडल्याचे आपण ऐकले आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये यासंबंधीत एक हैराण करून सोडणारी घटना घडली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये एका प्रोफेसरला ऑनलाइन क्लास संपल्यानंतर आपला व्हिडिओ कॅमेरा आणि माईक बंद न करणे महागात पडले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, युनिव्हर्सिटीमधील हे प्रोफेसर पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे झूम अॅपवर क्लास घेत होते. बराच काळ शिकवल्यानंतर आपण आता ब्रेक घेऊ असे प्रोफेसरने विद्यार्थ्यांना सांगितले. परंतु ब्रेक घेत असताना प्रोफेसर आपली प्रोजेक्टर स्क्रिन बंद करायला विसरले.

तसेच त्यांनी आपला कॅमेरा ही चालूच ठेवला. विद्यार्थ्यांनी ब्रेक घेतलाय हे समजताच प्रोफेसरने अॅडल्ट साईट ओपन करून ती पाहिला सुरुवात केली. यावेळी काही विद्यार्थी ऑनलाईनच होते. त्यांनी प्रोफेसर जे काही स्क्रीनवर करत आहे, बघत आहेत ते सर्व पाहिले. यामुळे विद्यार्थ्यांना ही धक्का बसला. यानंतर प्रोफेसरचे हे सर्व कृत्य मुख्यध्यापकांच्या कानावर गेले.

विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील हे सर्व ऐकून धक्का बसला. या सर्व प्रकरणानंतर पालकांनी म्हणले आहे की, आमची मुलगी शाळेत जायला नकार देत आहे. तिला आता तिथे शिकण्याची इच्छा नाही. जर मुख्यध्यापकांनी प्रोफेसरला शाळेतून काढले तर आम्ही मुलीला समजवू शकतो. या सर्व प्रकारामुळे ती हैराण झाली आहे.

दरम्यान प्रोफेसरचे हे कारनामे सगळीकडे चर्चेत आले आहेत. त्यामुळे युनिव्हर्सिटीची ही चांगलीच बदनामी झाली आहे. युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, २०१५ पासून हे प्रोफेसर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहेत. परंतु आतापर्यंत त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार आलेली नाही. याप्रकरणात युनिव्हर्सिटीने म्हणाले आहे की, आम्ही प्रोफेसरवर कारवाई करू त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात येईल.

दरम्यान ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील माईक चालू ठेवल्यामुळे आणि व्हिडिओ कॅमेरा बंद न केल्यामुळे असे विचित्र प्रकार समोर आले आहेत. याचे व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now