सेक्स प्रकरणाच्या संबंधीत कित्येक घटना माध्यमातून समोर येत असतात. मात्र यावेळेस एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. 14 वर्षीय विद्यार्थ्यांसोबत कार पार्किंगमध्ये सेक्स केल्यामुळे एका शिक्षिकेला 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. या प्रकरणात खोटे बोलल्यामुळे विद्यार्थांला ही जबाबदार धरण्यात आले आहे.
इंग्लंडमधील हॅना हॅरिस या शिक्षिकेचे इंस्टाग्रामच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांशी नाते संबंध जुळले होते. यानंतर विद्यार्थी आणि हॅना हॅरिस दोघे ही बाहेर भेटत असत. एके दिवशी या विद्यार्थांने हॅना आपल्या गर्लफ्रेंडची आई असल्याचे पालकांना सांगितले होते. या गोष्टीवर पालकांनी देखील विश्वास ठेवला होता.
यानंतर हॅना विद्यार्थ्यांच्या घरी येऊ लागली. माझी मुलगी आणि तुमचा मुलगा सोबत चांगला वेळ घालवतात. मला ही त्यांच्यासोबत फिरायला चांगले वाटते. असे हॅनाने पालकांना सांगितले. मात्र 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या भावाला आईचे आणि गर्लफ्रेंडचे पात्र खोटे असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे पालकांनी लगेच यासंबंधीत पोलिसात तक्रार नोंदविली. यावेळेस त्यांनी सांगितले की, हॅनाने आपली ओळख ऑलिव्हिया अशी सांगितली होती. या सर्व माहितीच्या आधारे पोलिसांनी हॅनाला अटक केले. हॅनाने कबूली दिली की, मी विद्यार्थी अल्पवयीन असताना देखील त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले आहेत.
याप्रकरणी अल्पवयीन मुलासोबत लैंगिक कृत्य केल्यामुळे हॅना हॅरिसला सेंट अल्बन्स क्राउन कोर्टाने सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच विद्यार्थ्याला देखील खोटे बोलल्यामुळे चांगलेच सुनावण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक अत्याचार करणे किंवा संबंध ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे.
परंतु तरी देखील अशा घटना समोर येत असतात. पोस्को कायद्यातंर्गत अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई करण्यात येते. या कारवाईत आर्थिक दंडवसूली किंवा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येते.
महत्वाच्या बातम्या
“उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही”, गोपीचंद पडळकरांची महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका
समाजवादी पक्षाचा पराभव कार्यकर्त्याला सहन झाला नाही; संतापाच्या भरात घेतले विष
ड्रायव्हिंग लायसेन्सच्या नुतनीकरणाला उशीर केला तर तुम्हाला भरावा लागेल तब्बल ‘एवढा’ दंड
ईडीचा राजीनामा देऊन उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत उतरलेल्या अधिकाऱ्याचं काय झालं? वाचा..