प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने सर्वांचाच वेड लागले होते. चित्रपटातील गाणी, कलाकारांची भूमिका आजही आपल्या लक्षात आहे. याच चित्रपटातील ‘स्पेशल.. स्पेशल..’ चहावाली देखील तुम्हाला चांगलीच आठवत असेल. अभिनेत्री मालविका गायकवाड असे तिचे नाव आहे.
तिने चहाची टपरी चालवणाऱ्या मुलीची राहुल्याच्या प्रेयसीची मुख्य भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका आजही अनेकांच्या मनावर राज्य करते. या चित्रपटामुळे मालविका गायकवाडला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मात्र ती एका दुसऱ्या कारणामुळे देखील चांगलीच चर्चेत आहे.
तुमचाही विश्वास बसणार नाही पण, मालविका ही एक प्रगतशील शेतकरी आहे. सध्या ती शेकडो शेतकऱ्यांना मदत करतेय. तसेच 18 कोटींची कंपनी चालवत आहे. विशेष बाब म्हणजे तिने मोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारून शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
तर जाणून घेऊया मालविकाची यशस्वी यशोगाथा.. मालविका गायकवाड ही एक इंजिनिअर आहे. मालविकाने सिनेसृष्टीत येण्याआधी एका नामांकित आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होती. मात्र तिला नोकरी करण्यात फारसा आनंद मिळत नव्हता. मग तिने सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला. हे पाहून नातेवाईक आणि मित्र मंडळींनी वेड्यात काढले.
मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम होती. दोन मित्रांना सोबत घेऊन ती दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. विशाल चौधरी, जयवंत पाटील आणि मालविका अशा तिघांनी ‘हंपी ए 2’ नावाची कंपनी सुरू केली. हळूहळू कंपनीचा विस्तार होऊ लागला. अन् काही दिवसांमध्येच कंपनीमधून तब्बल 18 कोटींचा फायदा झाला.
ते या कंपनीत दूध, तूप, दही,पनीर सोबत मिल्क ऑइल, कोकोनट ऑइल यासारखे अनेक पदार्थ बनू लागले. आज याचा मोठा विस्तार झाला आहे. तिच्यावर हसणारे, तिला टोमणे मारणारे आज तिलाच एक आदर्श मानतात. आता ही कंपनी तब्बल 18 कोटींच्या घरात गेली आहे. यामुळे तिच्यावर सर्व स्तरतून कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
NEXON नंतर टाटा बाजारात आणणार ‘ही’ दमदार कार, CRETA आणि VENUE सारख्या कार पडणार फिक्या
महिलेला मधलं बोट दाखवणं पडलं महागात; तरुणाला घडली आयुष्यभराची अद्दल, वाचा सविस्तर
२० कोटी देते पण माझ्याशी लग्न कर, चाहतीच्या या विचित्र मागणीवर कार्तिक आर्यनने दिले ‘हे’ मजेशीर उत्तर
काश्मिर फाईल्स: ७०० पेक्षा जास्त पिडीत कुटुंबाची ‘ही’ कथा ऐकल्यावर पल्लवी जोशीच्याही डोळ्यातून आले पाणी