दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी सतत मोबाईल वरती बोलत असायची. तिचे सतत मोबाइल मध्ये पाहणे बापाला पसंद नव्हते, त्यामुळे त्याने रागाच्या भरात तिच्यावर बलात्कार केला. बापानेच शुल्लक कारणामुळे मुलीवर बलात्कार केल्यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले.
ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातून समोर आली असून, एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशाखापट्टणम पोलिसांनी या 42 वर्षीय आरोपी बापाला अटक केली आहे. यादरम्यान त्याला रविवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी व्यक्तीला त्याची मुलगी फोनवर जास्त वेळ घालवल्याचा राग यायचा. नकार देऊनही मुलीने त्याचे ऐकले नाही, तेव्हा त्याने रागाच्या भरात आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यानंतर त्याने अनेक महिने आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. मीडिया वृत्तानुसार, ही बाब शनिवारी उघडकीस आली जेव्हा पीडित मुलगी शाळा बंद झाल्यानंतरही तिच्या घरी जायला तयार नव्हती.
विद्यार्थिनीने घरी जाण्यास नकार दिल्याने तिच्या एका शिक्षिकेने तिला विचारले की ती घरी का जात नाही. यानंतर विद्यार्थिनीने शिक्षिकेला आपला त्रास सांगितला. पीडितेने सांगितले की, तिचे वडील तिच्यावर अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. शनिवारी रात्री मुलीने शिक्षकांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी केली आहे.
त्याचवेळी, समोर आले की आरोपी बापाला दोन वर्षांपूर्वी किडनीचा आजार होता, त्यावेळी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. म्हणून त्याच्या पत्नीने तिची एक किडनी त्याला दान केली आणि त्याचे प्राण वाचवले. काही दिवसांनी आरोपीची पत्नी तिच्या दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी सोडून आईला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली होती. यानंतर आरोपी बापाने त्याच्या मुलीवर बलात्कार केला आणि अनेक महिने हा प्रकार सुरूच ठेवला. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
सध्या आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत आहेत, ज्यामध्ये अल्पवयीन मुलींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांवर बलात्कार होत आहेत. बलात्कार करणाऱ्यावर कठोर कारवाई होत नाही तसेच शिक्षा करण्यास दिरंगाई होत असल्याने बलात्कार करणारे नराधम मोकाट फिरताना आजही दिसतात. यावर आता कठोर पावले उचलणे आवश्यक आहे .