सध्या इंटरनेटचे युग आहे. इंटरनेटच्या या युगात एखादी गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते. आजकाल सोशल मीडियावर अनेक गंमतीशीर किंवा आश्चर्यचकीत करणारे व्हिडीओ व्हायरल होतात. आता असाच एक अजब व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो नेटकऱ्यांकडून हजारो वेळा पाहिला गेला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला लाखो लोकांनी आपापल्या शैलीत कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ एका ब्राह्मणाचा आहे, जो चक्क इंग्रजी मधून सत्यनारायणाची कथा सांगत आहे. तो कथा सांगताना उपस्थित इतर लोक लक्ष देऊन कथा ऐकत आहेत.
आजपर्यंत संस्कृत, मराठी आणि हिंदीमध्ये सत्यनारायण कथा ऐकण्यात आली, मात्र आता पाहिल्यादांच या व्हिडीओच्या माध्यमातून इंग्रजी मधून कोणी ब्राम्हण सत्यनारायणाची कथा सांगत असल्याचं बघायला मिळत आहे. व्हिडिओ पाहून तो दक्षिण भारतातील एका घरातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या व्हिडिओत ब्राह्मण सत्यनारायणाची कथा इंग्रजीत कशी सांगत आहेत आणि कुटुंबातील पुरुष, स्त्रिया आणि मुले त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकत आहेत हे तुम्ही पाहू शकता. व्हिडिओतील स्त्रीचा पेहराव, व्हिडीओमध्ये दिसणारे पूजेचे साहित्य आणि ते मांडण्याची पद्धत दक्षिण भारतीय संस्कृतीप्रमाणे दिसते.
पहले सत्यनारायण भगवान जी की कथा संस्कृत में होती थी फिर हिंदी में होने लगी अब इंग्लिश में सत्यनारायण जी की कथा सुनिए। pic.twitter.com/ZQhVDYBLfT
— skand shukla (@skandshukla) August 13, 2022
वास्तविक, दक्षिण भारतातील अनेक भागात इंग्रजी बोलली जाते. हेच कारण असावे की तिथे देवाची ही कथा इंग्रजीतही सांगितली गेली. यादरम्यान कोणीतरी पूजाचा व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही त्यावर आपापल्या शैलीत प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणी भारताच्या प्रगतीबद्दल बोलत आहेत तर कोणी नवीन विचार आणि नवीन शैली असे म्हणत आहे. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘हा एक चांगला मार्ग आहे. याद्वारे हिंदू धर्माचे ज्ञान इंग्रजांनाही समजावून सांगता येईल.