आजकाल तर लग्नाआधीच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड लिव्ह-इनमध्ये राहू लागले आहेत. नोकरीच्या काळात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला लग्नासाठी वेळ मिळत नाही. यामुळे अनेक जोडपी लग्नाशिवाय लिव्ह-इनमध्ये राहतात. असच एक जोडपं लिव्ह-इनमध्ये घर खरेदी करून राहत होते. मात्र काही दिवसांनी त्यांना घरातून अशी गोष्ट मिळाली ज्यामुळे त्यांना धक्का बसला.
पेनसिल्व्हेनियामध्ये राहणाऱ्या ट्रेसी डौड्सने तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्यासाठी एक छान घर विकत घेतले आहे. त्या घरात ती आणि तिचा बॉयफ्रेंड एकत्र राहत होते. दोघांनी घरातील कामं वाटून घेतली होती. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, परंतु काही दिवसांनंतर बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून खूप उग्र वास येऊ लागला.
हा दुर्गंध साधारणतः रात्रीच्या वेळी येत होता. काही दिवसांनी हा वास अधिक उग्र होत चालला. एवढा वास येऊ लागला की, बॉयफ्रेंडला त्या घरात राहणं कठीण झालं. त्याला आपल्या गर्लफ्रेंडवरती शंका आली की, नेमकी ती बाथरूम मध्ये काय करत आहे, ज्यामुळे एवढी दुर्गंधी येते.
यानंतर त्याने गर्लफ्रेंडच्या बाथरूमची झडती घेतली. यामध्ये त्याला वाटले की कदाचित प्रेयसीच्या बाथरूममध्ये काही प्राणी किंवा मांजर मरण पावले आहेत, ज्यामुळे इतका तीव्र वास येत आहे. हा प्राणी शोधण्यासाठी प्रियकराने प्लंबरला फोन करून घरी बोलावले.
बाथरुममध्ये प्राण्याचा शोध सुरू केला असता उलगडलेलं रहस्य पाहून बॉयफ्रेंडला धक्का बसला. बाथरूममधून असं काही मिळेल याची ट्रेसीनं कल्पना देखील केली नव्हती. दोघांना बाथरूममधून जे मिळालं ते माहिती पडल्यावर तुमचा देखील थरकाप उडेल.
बाथरूमच्या फरशीखाली मानवी सांगाडा होता. हे पाहून कोणाला विश्वास बसेना. माणसाचा मृतदेह तिथे पुरला होता. त्यामुळे तेथून प्रचंड दुर्गंधी येत होती. यानंतर जोडप्याने तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तपास केला असता, मृतदेह तेथे खूप पूर्वी लपवून ठेवल्याचे समोर आले. या घटनेनंतर गर्लफ्रेंडला धक्का बसला. इतके दिवस ती सडलेल्या प्रेतावर आंघोळ करत होती या विचाराने ती अस्वस्थ झाली.