Share

Ganesh Festival: राज्य सरकार गणपती मंडळांना देणार ५ लाखांचे बक्षीस; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

ganpati

गणेश उत्सव(Ganesh Festival): गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्व सण समारंभ निर्बंधात करावे लागले. या वर्षी मात्र जल्लोष व उत्साह दुपटीने वाढलेला दिसून येत आहे. नुकताच पार पडलेला सण दहिहंडी असो की, रक्षाबंधन तेवढ्याच उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. आता तर सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे उत्साह द्विगुणित होऊन सर्वत्र झळकत आहे.

हाच उत्साह वाढवण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अर्ज करावा लागतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर आहे.

याआधी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत होती. आता त्यात वाढ करून ती २ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. या पुरस्काराचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ लाख ५० हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपयांचं परितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

तसेच जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाकडून करण्यात आलं आहे. या स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

स्थानिक पोलीस ठाणे अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.pldeshpandekalaacademy.org या वेबसाईटवर What is news या सेक्शनमध्ये अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मंडळांची निवड जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल. हा अर्ज [email protected] या ई-मेलवर २ सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवण्यात यावा.

महत्वाच्या बातम्या
Madhya Pradesh: घर पाडताना कामगारांना मिळाला सोन्याची खजिना, गुपचूप वाटूनही घेतला पण नंतर मात्र…
‘आरक्षण लागू होऊच नये, यासाठी भाजपचा जन्म झाला आहे’
खुद्द शरद पवारांनीच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचा काय म्हंटलंय?
हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक! बाबूजमाल दर्ग्यावर का आहे गणेशाची मूर्ती?, वाचा सविस्तर

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट मनोरंजन

Join WhatsApp

Join Now