आईपीएल 2022 चे (IPL 2022) सामने 26 मार्चपासून सुरू होणार आहे. याआधी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. पायाच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) टी-20 लीगचे बहुतांश सामने खेळू शकणार नाही. नुकत्याच वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता.(The star player will lose Chennai Super Kings)
दीपक चहरला चेन्नईने लिलावात 14 कोटी रुपयांना विकत घेतले. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली सीएसकेने 4 वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. चालू सीजनमध्ये एकूण 10 संघ उतरत आहेत. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
बातमीनुसार, दीपक चहरची दुखापत गंभीर आहे आणि त्याला बरे होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. संघ सध्या त्याच्या दुखापतीच्या अंतिम अहवालाची वाट पाहत आहे. हा वेगवान गोलंदाज चेंडूने विकेट घेण्यात पटाईत आहे. दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांनीही लिलावात चहरला खरेदी करण्यात मोठा रस दाखवला होता.
29 वर्षीय वेगवान गोलंदाज दीपक चहरची कामगिरी टी-20 मध्ये उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 118 डावात 24 च्या सरासरीने 134 बळी घेतले आहेत. 7 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 3 वेळा 4 विकेट्स आणि दोन वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने अर्धशतकही झळकावले आहे. महत्त्वाच्या प्रसंगी त्याने आपल्या बॅटिंगने चमत्कारही केले आहेत.
दीपक चहर चेन्नईशी बऱ्याच काळापासून जोडले गेले आहेत. त्याने 58 सामन्यात 58 बळी घेतले आहेत. त्याने पहिल्या 6 ओवरमध्ये 42 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत तो आपल्या चेंडूने संघाला मोठे यश मिळवून देतो. गेल्या सिजनमध्ये त्याने संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होता.
महत्वाच्या बातम्या-
अंकिता लोखंडेने विकत घेतली आलिशान मर्सिडीज कार, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
राणे पिता- पुत्रांना होणार अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस
अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सोनालीने मारला टोमणा, नेटकऱ्यांनी तिच्याच चुका काढत झापले
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..