Nagpur Cricket ground : भारतीयांमध्ये क्रिकेट आणि राजकारण हे जिव्हाळ्याचे विषय मानले जातात. हे अनेक उदाहरणांवरून बघायला मिळाले आहे. आता हेच बघा ना.. नागपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-२० सामन्यावेळी एक मजेशीर गोष्ट घडली, याचा थेट संबंध महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींशी आहे.
क्रिकेट सामना पाहण्यासाठी नागपूरच्या VCA स्टेडियमवर आलेल्या प्रेक्षकांमध्ये एका प्रेक्षकाने ‘५० खोके एकदम ओक्के!’ घोषणा लिहिलेले पोस्टर हातात धरले होते. ते पोस्टर पाहताच इतर प्रेक्षकांनी सुद्धा ५० खोके, एकदम ओके! ही घोषणा स्टॅन्डमध्ये बसताना द्यायला सुरुवात केली.
‘५० खोके एकदम ओक्के!’ ही घोषणा मध्यंतरी मुंबई येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात प्रचंड गाजली होती. ठाकरे सरकार कोसळल्यावर नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला ही घोषणा वारंवार देत विरोधकांनी हैराण केले होते.
नागपूरमध्ये घडलेल्या या प्रसंगावरून हे स्पष्ट होते की, ही घोषणा विधानसभेचा पायऱ्यांवरून थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचली आहे. नागपूरमध्ये VCA स्टेडियममध्ये प्रेक्षकाच्या हातात झळकलेल्या या पोस्टरची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
नागपूरच्या हवामान खात्याने सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आधीच वर्तवली होती. त्यानुसार सामना सुरू होताना पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे ८ ओवरमध्ये सामना झाला. व ६ गडी राखत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.
नागपूरच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यामुळे नागपूर मेट्रोला मोठा नफा झाल्याचे समोर येते. तब्बल ८० हजारहून अधिक प्रवाशांनी एका दिवसात मेट्रो प्रवास केला. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमुळे नागपूर मेट्रोने रात्री उशिरा ३ वाजेपर्यंत मेट्रो चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय टळली.
महत्वाच्या बातम्या-
love affair : बायकोला प्रियकरासोबत रंगेहात पकडायला गेला अन् स्वतःच अडकला; कोर्टाने ठोठावलाय ४५ हजारचा दंड, वाचा हे प्रकरण आहे काय?
Eknath shinde : दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाची वेगळीच रणनीती; बोलावणार अतिमहत्वाची व्यक्ती
Shinde group : गुवाहाटीहून पुन्हा शिवसेनेत परतलेला ‘हा’ आमदारच बंडाचा खरा मास्टरमाइंड? झाला मोठा गौप्यस्फोट