शनिवारी देशातील कानाकोपऱ्यात शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी होत असताना जम्मू-कश्मिरमधील एका जवानाने शिवरायांना मानवंदना करण्यासाठी तब्बल 10 फुट उंचाचा शिवरायांचा पुतळा बर्फात साकारला होता. या पुतळ्याला पुष्पहार घालुन मानवंदना करण्यात आली. जवान प्रदिप तोडकर यांनी हा भव्य असा पुतळा बर्फात साकारला होता.
सध्या जवान प्रदिप तोडकर यांना बनविलेल्या पुतळ्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच प्रदिप तोडकर यांचे कौतुक देखील सगळीकडे होताना दिसत आहे. शेंद्री येथील प्रदिक तोडकर श्रीनगरमध्ये मराठा इन्फंट्रीच्या तुकडीमध्ये कार्यरत आहेत.
आपली ड्युटी करत असतानाच त्यांनी शिवजयंतीनिम्मित भव्य अशी मुर्ती उभारली होती. श्रीनगरमध्ये कार्यरत असलेले जवान दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करतात. यावर्षी देखील त्यांनी अशा अनोख्या पध्दतीने शिवजंयती साजरी केली आहे.
जवान प्रदिप तोडकर यांच्या कल्पनेतुन उभारलेल्या पुतळ्याला साकार करताना त्यांना जवान अशोक रगडे यांनी मदत केली. शनिवारी सकाळी 10 वाजता पुतळा तयार झाल्यानंतर जवानांनी शिवरायांची आरती केला. तसेच सर्व जवानांनी शिवगर्जना सादर केली.
दरम्यान पाकिस्तानच्या सीमेवर समुद्रसपाटीपासुन 1500 मीटर उंचीवर मराठा बटालियन तुकडी कार्यरत आहे. याठिकाणी फक्त 25 अंश इतकेच तापमान आहे. मात्र तरी देखील इथल्या जवानांनी शिवजयंती मोठ्या जलोषात साजरी केली आहे.
भारतातच नाही तर परदेशात देखील शिवजयंती साजरी करण्यात येते. या दिवशी अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यत येतात. शिवसैनिक मोठ्या उत्पुर्तीने सर्व कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवतात. य़ामध्ये भारतीय जवान देखील मागे असलेले दिसुन येत नाही.
महत्वाच्या बातम्या
मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं आणि…, गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर जहरी टीका
देशी दारूसाठी तरूणाने केला शोले स्टाईल धिंगाणा, टॉवरवर चढला आणि.., वाचून पोट धरून हसाल
सिद्धार्थने प्रेमाने मिठी मारताच लाजली कियारा अडवाणी, व्हिडीओ सोशल मिडीयावर झाला तुफान व्हायरल
९ वर्षांनी भेटायला आला माजी विद्यार्थी, आधी टीचरला चाकूने भोकसले मग दागिने, कॅश घेऊन पळाला