सध्या काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे आता तिथे राहणारे हिंदू भयभीत झाले आहेत. काश्मिरी पंडितांनी देखील खोऱ्यातून पलायन करण्याची घोषणा केली आहे. आज काश्मिरी पंडित मोठ्या संख्येने स्थलांतर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्यानं काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात आहे. या टार्गेट किलिंगच्या घटनेत गेल्या महिन्यात अनेक काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या आहेत. त्यातच काल दहशतवाद्यांनी एका हिंदू बँक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर तेथील हिंदू भयभीत झाले असून, सामूहिक पलायन करण्याची घोषणा केली आहे.
गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या हिंदू बँक व्यवस्थापकाचे नाव विजय कुमार आहे. यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. खोऱ्यातील ज्या ज्या भागांमध्ये आंदोलनं सुरू आहेत, त्या त्या ठिकाणची आंदोलनं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच, या बैठकीत काश्मीरमधील अल्पसंख्याकांपुढे आता कोणताच पर्याय उरलेला नाही. आंदोलन करून फायदा नाही, पलायन करणे हाच एकमेव उपाय असल्याचे या बैठकीत काश्मिरी पंडितांनी निर्णय दिला. त्यानुसार आता काश्मिरी पंडित नवयुग बोगद्याजवळ आज जमणार आहेत.
अनंतनागमधील सुरक्षा कॅम्पमध्ये राहत असलेल्या रंजन जुत्शी यांनी सांगितले की, वारंवार होणाऱ्या टार्गेट किलिंगच्या घटनांमुळे गेल्या २२ दिवसांपासून सर्व काश्मिरी पंडित आंदोलन करत आहेत. परवा रजनी बाला यांना संपवण्यात आलं. नंतर, राहुल भट यांची हत्या झाली. आता विजय कुमार यांना गोळी झाडून मारलं. या सगळ्या भयानक घटना आहेत.
या घटनेनंतर आम्ही आमची सुरक्षित सुटका करण्याची मागणी करत आहोत. ज्याप्रकारे १९९० मध्ये पलायन झालं होतं, त्याचप्रकारे आता आम्ही पलायन करत आहोत. जवळपास ३ हजार कर्मचारी आधीच जम्मूला पोहोचले आहेत. मट्टन परिसरातून २० वाहनं निघाली आहेत, असे त्यांनी सांगितले.