Share

Bundelkhand: दुकानदाराने समोसा सोबत प्लेट, चमचा दिला नाही म्हणून पठ्याने थेट मुख्यमंत्र्यांना लावला फोन, म्हणाला..

samosa

मध्य प्रदेश (Bundelkhand): सध्यस्थितीमध्ये विचित्र आणि आश्चर्यकारक प्रकरणे समोर येत आहेत. यावेळी एक अतिशय रंजक प्रकरण समोर आले आहे, जिथे दुकानदाराने समोशासोबत प्लेट आणि चमचे दिले नाहीत. त्याची तक्रार राज्यातील सर्वात मोठी सीएम हेल्पलाईनवर करण्यात आली आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशातील बुंदेलखंड येथील छतरपुरचे आहे.

हे प्रकरण ३० ऑगस्ट रोजीचं आहे. वंश बहादूर असं या व्यक्तीचं नाव आहे. बसस्थानकावर असलेल्या राकेश समोसा नावाच्या दुकानात हा व्यक्ती गेला होता. बसस्थानकावर असलेल्या समोस्यांच्या दुकानात समोस्यासोबत प्लेट आणि चमचा न दिल्याने संतापलेल्या ग्राहकाने १८१ वर डायल करून तक्रार केली. तक्रारदाराने सांगितले की, मी बसस्थानकावरून समोसे आणले, मात्र मला प्लेट आणि चमचा दिलेला नाही.

कृपया माझी समस्या लवकरात लवकर सोडवा. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या मोबाईलवरून सीएम हेल्पलाईनवर तक्रार केली. दुकानदारला विचारले असता तो बोलला की, आम्ही प्रत्येकाला वाट्या आणि चमचे देतो, कदाचित तेव्हा ती वेळ संपली असेल, त्यामुळेच दिली नसेल. मात्र, हे प्रकरण रंजक असल्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.

सीएम हेल्पलाइनमध्येही ही विचित्र तक्रार स्वीकारण्यात आली. मात्र तब्बल १५ दिवस डोके लावून ही तक्रार ५ सप्टेंबर रोजी बंद करण्यात आली. सीएम हेल्पलाईनवर अशा विचित्र केसेस येत असतात. यापूर्वी एक विचित्र प्रकरण समोर आले होते.

येथे एक भटका बैल लोकांसाठी संकट बनला होता. शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस शहरात या बैलाने दहशत निर्माण केली होती. हा बैल लोकांच्या घरात घुसून लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत होता. परिस्थिती अशी झाली होती की ना नगर पंचायत लोकांची सुटका करू शकली ना हे लोक बैलाला हुसकावून लावू शकले.

अखेर नगरकरांनी खवळून मुख्यमंत्र्यांना बैलाची सुटका करण्याची मागणी केली. सरतेशेवटी या बैलापासून सुटका व्हावी, यासाठी शहरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या सीएम हेल्पलाईन १८१ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.

महत्वाच्या बातम्या
…अन् संतापलेल्या इंदुरीकरांना अखेर धनंजय मुंडेंचं ऐकावंच लागलं; परळीत भर किर्तनात झाला राडा
Eknath Shinde: राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज, एक फोटोसेशनसाठी आणि एक.., सुप्रिया सुळेंचा टोला
शेतकऱ्याचा नाद नाय! देवीच्या जागरणासाठी विकली 9 एकर जमीन, केला तब्बल ‘एवढा’ खर्च
Aditya Thackeray : याकूब मेमनच्या थडग्यावरून आरोप करणाऱ्या भाजपची आदित्य ठाकरेंनी केली पोलखोल, म्हणाले…

ताज्या बातम्या इतर तुमची गोष्ट मनोरंजन

Join WhatsApp

Join Now