Share

Udhhav thackeray : शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांचे जेलमधून सुटताच मातोश्रीवर जल्लोषात स्वागत; ठाकरेंनी दिली शाबासकी

गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत वादावादी झाली होती, त्या ठिकाणचे वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी माईकवरुन म्याव-म्यावचा आवाज काढत शिवसैनिकांना डिवचले देखील होते.

त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि हा वाद तात्पुरता शमला. मात्र, पुन्हा एकदा दादर पोलीस स्टेशनच्या परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गट आमनेसामने आले. तेव्हा आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

हा वाद खूप चिखळला, सरवणकर यांनी आपल्यावर झालेला आरोप फेटाळून लावला. त्यानंतर, पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले, महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी त्यावेळी शिवसैनिकांनी माझी दोन तोळ्याची चेन चोरली, अशी तक्रार तेलवणे यांनी दादर पोलिसांकडे दाखल केली होती.

त्यामुळे शिवसेना अँक्शन मोडमध्ये आली, आणि रविवार पासून पोलीस ठाण्यात शिवसेनेचे बडे नेते दाखल होताना दिसले. सरवणकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्याच्या बाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला. शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला.

या प्रकरणात शिवसैनिकांना जामीन मिळाल्यानंतर हे सर्वजण थेट मातोश्रीवर दाखल झाले. याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. परंतु, त्यांना संयम बाळगण्याचाही सल्ला दिला. सर्व शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचा यावेळीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात आला. आता हा वाद आणखी किती चिघळणार हे पाहावे लागेल. पोलिसांनी आता या प्रकरणात सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने देखील तसा जबाब नोंदवला आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now