Share

Eknath Shinde: कोर्टाचा निर्णय शिंदेगटाला पचला नाही, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात घेणार धाव

cm shinde and thakare

Eknath Shinde : शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यात सण, उत्सव साजरे करण्याच्या ठिकाणावरून चांगलाच जंगी आखाडा रंगल्याचे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र बघतोय. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी शिवसेनेने आणि शिंदे गटाने सुद्धा प्रथम महानगरपालिकेला परवानगी मागितली होती. दोन्ही गटाचे अर्ज फेटाळून लावत मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली.

त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे गेलं. उच्च न्यायालयाने दोन्ही गटांच्या याचिकेवर आज सुनावणी करत उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र शिंदे गट याबाबत नाराज आहे. या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ, असा सूर त्यांनी आळवला असल्याचे दिसते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात शिंदे गट लवकरच सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या सुनावणीबाबतची अंतिम कॉपी हातात पडल्यानंतर आज किंवा उद्या याबाबत निर्णय घेऊ, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आल्याचे समोर येते.

शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी उच्च न्यायालयात आपणच खरी शिवसेना आहोत. त्यामुळे आपल्यालाच परवानगी द्यावी, असे म्हटले होते. मात्र उच्च न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. म्हणून शिंदे गट आता सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करत ताबडतोब सुनावणी करावी अशी विनंती करणार आहे. तसेच याबाबत अर्ज करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर अनेक सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले आहे. गणेशोत्सवाला रात्री बारापर्यंत साऊंड लावण्याची परवानगी त्यांनी दिली. दहीहंडीच्यावेळी अनेक ठिकाणी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला.

दुर्गाडी गडावर नवरात्र उत्सव साजरा करण्यावरून पण शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद- प्रतिवाद आतापर्यंत राजकीय मैदानात सुरू होते. मात्र आता त्यांच्या वादाने सांस्कृतिक सण, उत्सवांच्यामध्ये शिरकाव केला. त्यामुळेच दसऱ्याला आता शिवतीर्थावर कोण सोनं वाटत सीमोल्लंघन करतं? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
Dussehra gathering : शिंदेंनी डाव टाकलाच होता, पण ‘या’ चूकीमुळे पलटला फासा; वाचा कोर्टात कोणता फॅक्टर ठरला गेमचेंजर
Ajit Pawar : मविआमध्ये मला गृहमंत्रीपद हवं होतं पण वरिष्ठांनी…; अजितदादांची खदखद अखेर बाहेर आलीच, म्हणाले..
Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याला परवानगी मिळताच उद्धवजींची पहिली प्रतिक्रिया; ‘विजयाच्या तयारीला लागा, कारण…

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now