चार वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या प्रियकराला आपल्या प्रियसीवर संशय आला आणि त्याने चक्क व्हॅलेंटाइन डे च्या रात्री प्रियसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव शालिनी धुरिया आहे. शालिनीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता, चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा बॉयफ्रेंड आहे.
तिच्या बॉयफ्रेंडचे नाव रवी ठाकूर आहे. त्याचे वय 24 वर्ष असून, हा मूळ बिहारच्या जेहानाबादमधील मकदुमपूर डीहचा रहिवासी आहे. सध्या रवी प्रयागराज येथे राहतो. प्रयागराज पोलिसांनी बुधवारी मिंटो पार्कजवळून रवीला अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला आहे. हत्येमागील कारण ऐकून पोलिसही हादरले.
माहितीनुसार, त्याचे शालिनीवर मनापासून प्रेम होते. गेल्या 4 वर्षांपासून ते दोघं रिलेशनशीपमध्ये होते. 14 फेब्रुवारीला सकाळी शालिनी दिल्लीहून प्रयागराजला आली, प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ती ट्रेनने उतरली होती. यानंतर रवी तिला घेऊन लोको कॉलनी येथील घरी आला.
शालिनी फ्रेश होण्यासाठी वॉशरुममध्ये गेली होती, तेव्हा त्याने तिचा मोबाईल तपासला, तेव्हा त्याला हादराच बसला. कारण ज्या शालिनीवर जीव लावत होता, तिचे इतर मुलांसोबतचे फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडीओ त्याला पाहायला मिळाले. आपल्या प्रेयसीचे इतर मुलांशीही संबंध असल्याचा रवीला संशय होताच. ही गोष्ट त्याच्या मनात घर करुन गेली होती.
शालिनीचे इतर कोणत्याही मुलाशी असलेले संबंध त्याला सहन होत नव्हते. शालिनी वॉशरूममधून बाहेर आल्यावर रवी ठाकूरने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह एका पोत्यात भरुन घेतला. नंतर मृतदेह सायकलवरुन नेत पोलो ग्राऊंडवर बांधलेल्या विहिरीत फेकून दिला. घटनेच्या सात दिवसानंतर पोलिसांना मृतदेह सापडला.