बॉलिवूडचे दिग्गज निर्माते भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि मुराद खेतानी (Murad Khetani) सध्या ‘भूल भुलैया २’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी तो १०० कोटींचा टप्पा पार करेल. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा एक मल्टीस्टार चित्रपट आहे. आता दोन्ही निर्मात्यांनी एकत्र येऊन शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे.(Bhushan Kumar, Murad Khetani, Shahid Kapoor, Kabir Singh)
‘भूल भुलैया २’ हा दोन्ही निर्मात्यांचा एकत्र दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी मिळून २०१९ मध्ये शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट तयार केला होता, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. भूषण आणि मुराद म्हणाले की, ते ‘कबीर सिंग’ला फ्रेंचायझीमध्ये रूपांतरित करण्याचा विचार करत आहेत.
एका वृत्तसंस्थेशी झालेल्या संभाषणात भूषण कुमारला विचारण्यात आले की, ते फ्रँचायझी म्हणून कोणता चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘मला वाटते की आमचा कबीर सिंग हा चित्रपट फ्रँचायझी बनू शकतो. त्याचे प्रतिकात्मक पात्र पुढील भागात घेता येईल. मुराद खेतानी भूषणच्या या मुद्द्यावर सहमत असल्याचे दाखवतात.
मुराद खेतानी म्हणतात, ‘कबीर सिंग हे पात्र खूप लोकप्रिय आहे आणि त्यासाठी आपण कथेचा विचार करायला हवा’. याशिवाय ‘आशिकी ३’ बनताना पाहण्याची इच्छा असल्याचंही मुराद सांगतात. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये कबीर सिंग चित्रपटाच्या सीक्वलबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच आता पुढे कोणती नवीन गोष्ट पाहायला मिळणार याचाही आनंद आहेच.
‘भूल भुलैया’च्या पुढच्या भागाबद्दलही दोन्ही निर्मात्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. ते म्हणाले, ‘आम्ही भूल भुलैया फ्रँचायझी पुढे नेऊ. यासाठी भरपूर वाव असून योग्य वेळी ते जाहीर करू. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा चित्रपट ‘भूल भुलैया २’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याची माहिती आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास ९२ कोटींची कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाहिद कपूरचा jersey फ्लॉप झाल्यानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, साऊथचे रिमेक बनवायचे बंद करा
शाहिद कपूरच्या या कृतीने संतापले चाहते, रिलीजच्या पहिल्याच दिवशी जर्सीवर बंदीची मागणी
मीरा राजपूतचे पहिले प्रेम मी नाही; शाहिद कपूरने स्वत:च केला होता मोठा खुलासा
पद्मावतमध्ये सलमानला खलनायक म्हणून पाहायचे आहे ऐश्वर्याच्या या अटीवर भन्साळी म्हणाले..