Share

कोरोना महामारीत देखील अतिश्रीमंतांकडे पैसा सडला, कंगालांना भुकेची मारामार !

anil ambani

कोरोना महामारीत अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. करोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. परंतु या काळात अनेकांचे रोजगार गेले. हातावर पोट असलेल्या नागरिकांना शहर सोडावे लागले. आता कोरोना विषाणूचा प्रसार कमी होताना दिसत असल्याने पुन्हा सरकारने नियम शिथिल केले. यामुळे आता अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा व्यवस्थित होण्याच्या मार्गावर येत आहे. (the rich have run out of money the poor are starving news)

अशातच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जाहीर केलेल्या बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये  २०१९ पेक्षा दोन कोटी अधिक लोक बेरोजगार होतील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता कुठेही जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाहीत. तसेच जागतिक स्तरावर कोराेनाच्या आधीच्या स्थितीपेक्षा सुमारे ५२ दशलक्ष  नोकऱ्या कमी झाल्या आहेत. २०२३ मध्ये सुमारे २७ दशलक्ष नोकऱ्या कमी होतील.

आवाहलात दिल्यानुसार, भारतात वरच्या आर्थिक स्तरातील दहा टक्के लोकांकडे राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५७ टक्के भाग जातो तर, खालच्या वर्गातील तब्बल निम्म्या लोकसंख्येकडे केवळ १३ टक्के भाग जातो. देशातील मध्यम वर्गाकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा केवळ २९.५ टक्के भाग येतो; परंतु मध्यम वर्गाचे लोकसंख्येतील प्रमाण आहे चाळीस टक्के. सर्वांत श्रीमंत अशा अवघ्या एक टक्के वर्गाकडे देशाच्या एकूण उत्पन्नाच्या बावीस टक्के भाग जातो.

तर दुसरीकडे भारतातील मूठभर श्रीमंतांच्या संपत्तीचा ९९.९९ टक्के भाग काढून घेतला, तरी ते दररोज सात लाख डॉलर खर्च करून ८४ वर्षे जगू शकतील. कोरोनाने हे दाखवून दिले आहे की, विषमता निर्मूलन, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केल्याशिवाय कोणताही देश खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ शकत नाही.

दरम्यान, याबाबत मत मांडताना तज्ज्ञ म्हणतात, भारताने उद्योगांना करातून सूट देण्याऐवजी गरीब कुटुंबांना उत्पन्नाची हमी द्यायला हवी. समाजातील बहुतांश लोकांची क्रयशक्ती वाढल्याखेरीज बाजारपेठेत वस्तूंची विक्री होत नाही. अर्थशास्त्रीयद़ृष्ट्या बाजारपेठांमध्ये विक्री मोठ्या प्रमाणावर व्हावी असे वाटत असेल तर, देशातील बहुतांश लोकांच्या हातात पैसा असणे ही प्राथमिक गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या
युपीच्या इलेक्शनमध्ये ठाकरे पॅटर्न; अखिलेश यादवांनी केली मोठी घोषणा
‘सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे अन् शहांचा मुलगा ढोकळा विकतो का; ‘त्या’ आरोपांवर शिवसेना भडकली
अनुपम खेर यांनी अल्लू अर्जूनचे केले तोंडभरून कौतुक; अभिनेत्यासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा
फक्त नऊ वर्षाचा असणारा ‘हा’ मुलगा आहे अब्जाधीश, खेळण्यासाठी वापरतो करोडोंच्या गाड्या अन् प्रायव्हेट जेट

आर्थिक इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now