एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात मोठा राजकीय भूकंप घडून आला. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांनाही आपल्या बाजूने वळवले आहे. या स्वतंत्र गटाचे तसे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले जाणार होते, परंतु या संदर्भात मोठी अपडेट येत आहे. (The revolt of Shiv Sena MPs failed miserably)
सोमवारी रात्री १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले. १२ खासदारांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत या गटाच्या नेते पदासंदर्भात चर्चा झाली.
राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील १२ खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. आपल्या गटाचे पत्र सचिवालयाला दिले. परंतु सचिवालयाने ते पत्र न स्वीकारता त्यामध्ये काही बदल सुचवले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी खासदारांची जी बैठक घेतली. त्यावेळी शिवसेनेच्या लोकसभा संसदीय पक्षनेतेपदी राहुल शेवाळे तर गटाच्या प्रवक्तेपदी भावना गवळी असणार हे निश्चित करून तसे पत्र सचिवालयात देण्यात आले.
सचिवालयाने पत्रामध्ये जे बदल सुचवले आहेत त्यानुसार, मुख्यप्रतोद असणाऱ्या व्यक्तीच्या नावाने ते पत्र पुन्हा पाठवण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. त्यामुळे आता शिंदे गटाकडून १२ खासदारांचे हे पत्र पुन्हा सचिवालयात जाण्याचा मार्ग कठीण झाल्याचे दिसते.
भावना गवळी यांची मुख्य प्रतोदपदावरून काही दिवसांपूर्वी शिवसेनेने हकालपट्टी केली होती. त्यांच्या जागेवर राजन विचारे यांची नियुक्ती करण्यासंदर्भातले पत्र शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी सचिवालयाला दिले होते. शिंदे गट आणि शिवसेना यांच्या संदर्भातील कोर्टाचा निकाल अजून बाकी आहे. तो निकाल आल्यावर सचिवालय देखील या संदर्भात आपला निर्णय देईल. अशी चिन्हे दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मच्छरांना मारण्यासाठी तयार केले झक्कास मशिन, मोकळ्या जागेतही करू शकता ‘असा’ वापर
झटपट काम आईच्या हातांना आराम! 14 वर्षीय चिमुकलीने आईसाठी बनवलं 8 कामं करणारं मशीन
सोन्याची नाही तर हिरा.., गोल्ड डिगर आणि लालची म्हणणाऱ्यांना सुष्मिताने दिले सडेतोड उत्तर